Valentine Day Special - मेरा दिल खोले तो, तेरा दिल नजर आयेगा.... 

सुधाकर काशीद 
Friday, 14 February 2020

कोल्हापूर : 
"मैने तुझे दील दिया... 
मैं मेरा दिल खो बैठा हु.... 
मेरा दिल खोले तो, तेरा दिल नजर आयेगा.... 

हे सारे डायलॉग चित्रपटात किंवा "व्हॅलेंटाईन -डे'च्या निमित्ताने शायनिंग करण्यासाठी ठीक आहेत. आणि त्यासाठी फिटटही आहेत. 

कोल्हापूर : 
"मैने तुझे दील दिया... 
मैं मेरा दिल खो बैठा हु.... 
मेरा दिल खोले तो, तेरा दिल नजर आयेगा.... 

हे सारे डायलॉग चित्रपटात किंवा "व्हॅलेंटाईन -डे'च्या निमित्ताने शायनिंग करण्यासाठी ठीक आहेत. आणि त्यासाठी फिटटही आहेत. 
वास्तवात असं काही नसतं हेही खरे आहे. पण कोल्हापुरात खरोखरच एक तरुण दुसऱ्याचे हृदय आपल्या हृदयाच्या कप्प्यात घेऊन जगतो आहे. किंबहुना शरीर त्याचे असले तरी त्याचा प्रत्येक श्वास त्या हृदयातून येणारा आहे. यानिमित्ताने तो व्हॅलेंटाईन डे, नव्हे तर व्हॅलेंटाईन लाइफच जगत आहे. जरूर त्याच्या कप्प्यात एका अज्ञाताचे हृदय बसवले आहे आणि तो त्या अज्ञाताच्या हृदय देणगीबद्दल त्याच्याबद्दल प्रत्येक श्वासागणिक प्रेमाची भावना व्यक्त करीत आहे 
उद्या(ता.14) व्हॅलेंटाईन डे त्यामुळे दिल, धडकन, सांस या शब्दाचीच चर्चा चालू आहे. उद्या तर या "दिला"वर सारे दिलवाले फुल, चॉकलेट, शुभेच्छा कार्ड किंवा मोबाईल संदेशाच्या रूपात प्रेमाची उधळणच करणार आहेत. या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने एका अज्ञाताने दान केलेल्या हृदयावर जगणारा प्रशांत कुचेकर "दिल की धडकन म्हणजे काय असते? हे क्षणाक्षणाला अनुभवत व्हॅलेंटाईन लाईफ जगत आहे. 

प्रशांत चौतीस वर्षाचा. तीन वर्षापूर्वीपर्यंत धट्टाकट्टा. एम. ए., बी. एड., सेट अशा पदव्या घेतघेत पुढे शिकणारा. पण त्याला अचानक चालताना दमछाक होत असल्याची जाणीव होऊ लागली. उपचार सुरू झाले. आणि लक्षात आले की प्रशांतच्या हृदयाची क्षमता केवळ 20 ते 25 टक्के आहे. याशिवाय त्याच्या हृदयाचा आकार ही वाढलेला आहे. त्यामुळे येथून पुढे त्याला जगायचे असेल तर ह्रदयाचे प्रत्यारोपण हाच मार्ग असल्याचे डॉक्‍टर चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आणि त्यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झाले. आता येथून पुढे खऱ्या अर्थाने प्रशांत व त्याच्या परिवाराची खरी धावपळ सुरू झाली.

हृदयविकारावरची औषधे जेथे स्वस्त मिळण्याची शक्‍यता नाही, तेथे साक्षात दुसऱ्याचे रुदय आपल्या हृदयाच्या जागी बसवण्याची व त्याच्या खर्चाची कल्पना प्रशांतच्या कुमकुवत हृदयाचे ठोके आणखी वाढवणारी ठरली. पण प्रशांतला जगायचे होते. मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्याचे पुढचे उपचार सुरू झाले. हृदयाचे अवयव दान केलेल्या एका अज्ञाताचे हृदय प्रशांतसाठी वापरायचे ठरले. अर्थात जोखमीची ही शस्त्रक्रिया होती. पण ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आणि प्रशांतला त्याच्या हृदयाच्या कप्प्यात बसवलेल्या नव्या हृदयातून श्वास घेण्याची संधी मिळाली. 

"माय हार्ट इज बीटिंग...
आज प्रशांत व्यवस्थित फिरतो आहे. पटणार नाही व्यायाम म्हणून तो रोज दहा किलोमीटर चालतो आहे. आता तर बासरी वाजवायचा सराव करतो आहे. या बासरीतून एक ना एक दिवस तो सुराची लय पकडणार आहे. आणि त्या सुरातून "माय हार्ट इज बीटिंग किप्स ऑन रिपिटींग,आय ऍम वेटिंग फॉर यु' या गीताचे सूर त्या अज्ञात हृदयदान करणाऱ्याला तो समर्पित करणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If I open my heart, your heart will see