मराठमोळ्या बेळगावच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका

indian origin Millionaire Shrinivas Thanedar Elected to Michigan State Legislature in US
indian origin Millionaire Shrinivas Thanedar Elected to Michigan State Legislature in US
Updated on

बेळगाव - एका मराठमोळ्या बेळगावकराने आता अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या लोकप्रतिनिधीगृहात प्रवेश केला आहे. मूळचे बेळगावचे असलेले व सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले उद्योजक श्रीनिवास ठाणेदार यांची मिशिगन राज्यातून ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्ये निवड झाली आहे. एकूण ९३ टक्‍के मते मिळवून ते विजयी झाले. विशेष म्हणजे त्यांनी दोन वर्षांपूर्वी गर्व्हनरपदही सांभाळले आहे. त्यांची ही कामगिरी बेळगावकरांसाठी निश्‍चितच अभिमानास्पद आहे.

श्री. ठाणेदार यांचा जन्म शहापूरमधील मिरापूर गल्लीत झाला. सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करुन त्यांनी चिंतामणराव हायस्कूलमधून ५५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केली. १९७७ मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली. डॉ. ठाणेदार १९७९ मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे १९८२ मध्ये त्यांनी पॉलिमर केमिस्ट्रीत पीएचडी संपादन केली.
१९८४ ते १९९० या कालावधीत त्यांनी सेंट लुईसमधील पेट्रोलाईट कॉर्पोरेशनमध्ये पॉलिमर सिंथेसिस केमिस्ट आणि प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले. १९९० मध्ये त्यांनी स्वतः काम करत असलेली केमिर ही कंपनी विकत घेतली. त्यांच्या दूरदर्शीपणामुळे जेमतेम खप असलेल्या या कंपनीच्या उत्पादनांचा वार्षिक खप वाढला. 

यशस्वी उद्योजकतेच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे ४०० हून अधिक लोकांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. श्रीनिवास यांनी सुमारे आठ विभिन्न उद्योग खरेदी केले अन्‌ विकले. अडचणीत आलेले उद्योग पुन्हा भरभराटीला आणणे यात ठाणेदार यांचा हातखंडा मानला जातो.
 
श्री. ठाणेदार सध्या ६५ वर्षाचे असून असून संशोधक व प्रख्यात व्यावसायिक आहेत. त्यांची संपत्ती ४,३८,६२० अमेरिकन डॉलर आहे. मिशिगनमधील तिसऱ्या जिल्ह्यातून त्यांनी ९३ टक्के मते मिळवून सहा प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. यशस्वी उद्योजक आणि आता अमेरिकेत लोकप्रतिनिधी झालेल्या श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही श्रीची इच्छा’ या आत्मचरित्राच्या पुस्तकाचाही विक्रमी खप झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांत काहीही बदल झालेला नाही. हा बदल मी घडवेन. अनेक लोक वंचित आहेत. मीही जमिनीवर झोपून दिवस काढले आहेत. गरिबांचे दुःख मी जाणतो.
-श्रीनिवास ठाणेदार


संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com