उद्यापासून दुकाने बंद ही अफवाच 

 It is rumored that shops will be closed from tomorrow
It is rumored that shops will be closed from tomorrow
Updated on

कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. 10)पासून शहरातील दुकाने बंद राहणार असल्याची बातमी ही अफवा असून, 17 मेपर्यंत व्यापारी संकुलातील दुकाने मात्र बंदच राहणार असल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे.

राज्यात आणि देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन पुकारण्यात आला होता. त्यानंतर काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यातही सम व विषम तारखेला एका बाजूची दुकाने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. ही दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायझरचा वापर करण्याची सक्‍ती करण्यात आली होती. तेव्हापासून शहरातील जनजीवन काही अंशी पूर्वपदावर येत आहे.

अशातच आज समाज माध्यमांवर उद्यापासून दुकाने बंदची बातमी पसरली आणि कोल्हापुरात खळबळ उडाली. वास्तविक, मोठ्या व्यापारी संकुलातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. याशिवाय, यापूर्वी ज्या दुकानांना परवानगी दिली आहे, ती तशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे उद्यापासून कोणतीही दुकाने बंद होणार नाहीत. एकाच व्यापारी संकुलात अनेक दुकाने आहेत, अशी महापालिकेसह इतर खासगी संकुलातील दुकाने बंद राहणार आहेत.

लॉकडाउनमध्ये मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्‍समधील दुकाने बंदच राहणार आहेत. तथापि, काल शिवाजी स्टेडियम व इतर कॉम्प्लेक्‍समधील दुकाने सुरू दिसली. त्यांच्यावर कारवाई केली आहे. शहरात 60 व्यापारी संकुले आहेत, यापैकी 19 कॉम्प्लेक्‍स पालिकेची, तर 41 खासगी आहेत. यातील जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानाशिवाय कोणतेही दुकान सुरू राहणार नाही. गर्दी टाळण्यासाठी आवश्‍यकता असेल तरच बाहेर पडावे, त्याशिवाय आपण ही लढाई जिंकू शकणार नाही. 
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com