esakal | दिवाळी सुट्टीचा फायदा घेणाऱ्या जत भागातील वाळू तस्करांना दणका 
sakal

बोलून बातमी शोधा

Karjagi Bhivargit Sankh Tehsil Office Squad for  Sand smuggling

करजगी, भिवर्गीत संख तहसिल कार्यालय पथकाच्या धाडी 

दिवाळी सुट्टीचा फायदा घेणाऱ्या जत भागातील वाळू तस्करांना दणका 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संख (सांगली) : दिवाळी सुट्टीचा फायदा घेऊ पाहणाऱ्या जत तालुक्‍यातील पूर्वभागातील वाळू तस्करांना संख अप्पर तहसील कार्यालयाच्या पथकाने जोरदार दणका दिला. करजगी, भिवर्गी येथे संख महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून वाळू भरलेला ट्रॅक्‍टर पकडला आहे.जप्त केलेला संख अप्पर तहसीलदार कार्यालय आवारात लावला आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. 


जत पूर्व भागात महसूल व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहेत. पूर्व भागातील संख, भिवर्गी, बालगाव, करजगी, सुसलाद, सोनलगी, बेळोंडगी ही गावे तस्करीची केंद्रे आहेत. अप्पर तहसीलदार हनुमंत मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली महसूलच्या पथकाने शनिवारी करजगी, भिवर्गी, सुसलाद, सोनालगी येथे धाडी टाकल्या. करजगी येथे वाळूने भरलेला ट्रॅक्‍टर (के.ए.28 टी-7149) आढळला. महसूलच्या पथकाने ट्रॅक्‍टर जप्त करून अप्पर तहसीलदार कार्यालयात नेला.

हेही वाचा- चोरट्यांनी साधली दिवाळी; सलग दोन घरफोड्यामुळे ग्रामस्थ भयभीत

भिवर्गी येथे वाळू तस्करांनी पथक आल्याचे कळताच पथकाला फसवून पलायन केले. ट्रॅक्‍टर मालकाचा शोध घेऊन नोटीस दिली जाणार आहे गौण खनिज उत्खनन कायद्यानुसार दंड केला जाणार आहे. यापुढेही वाळू तस्करांविरोधात मोहीम राबवली जाईल अशी माहिती श्री. म्हात्रे यांनी दिली.  

संपादन- अर्चना बनगे