कोल्हापूर जिल्ह्याची दुसऱ्या लाटेकडे वाटचाल ;  बाधितांच्या संख्येत चारपटीने वाढ 

 Kolhapur district on its way to the second wave; Quadruple the number of victims
Kolhapur district on its way to the second wave; Quadruple the number of victims
Updated on

कोल्हापूर  : जिल्ह्यात 25 दिवसांत 1124 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही वाढ जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. यातही शहरातील कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे. 1 मार्चपासून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या पाहिली तर जवळपास यात चारपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

15 ते 21 मार्च या आठवड्यात तर केलेल्या चाचण्यात साडेपाच टक्‍के लोक कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच कोरोनाचा विस्फोट व्हायचा नसेल तर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतरासह गर्दीच्या ठिकाणी जाणे व अनावश्‍यक फिरणे टाळल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती आहे. 

जिल्ह्यात मार्च 2020 या काळात कोरोनाचे आगमन झाले. मेपासून कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला. या दोन महिन्यात तब्बल 38 हजार 497 रुग्ण सापडले. एकूण रुग्णाच्या जवळपास 50 टक्‍के रुग्ण हे दोन महिन्यांत सापडले आहेत. यानंतर ऑक्‍टोबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत रुग्णांची संख्या कमी होत गेली. मात्र फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. 1 मार्च ते 25 मार्च 2021 या कालावधीत कोरोनाचे 1124 रुग्ण आढळले आहेत. मधल्या काळात चाचण्यांची संख्याही कमी झाली होती. मात्र आता चाचण्या वाढतील व कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढेल तसे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 
कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ही वाढ ग्रामीण भागापेक्षा शहरातच मोठ्या प्रमाणात दिसत आहे. कोल्हापूर महापालिका, नगरपालिका व यानंतर ग्रामीण भागाचा नंबर लागत आहे. शहरातील रुग्णवाढ थांबवण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. नो मास्क नो एंट्री, अशी जी काही घोषणा केली आहे, त्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर लक्ष देणे गरजेचे असून ज्या पद्धतीने कोरोनाच्या टेस्ट वाढवल्या आहेत तसेच आता कारवाईही वाढवावी लागणार आहे. 

मृत्यूदर हा 3.43 टक्‍के 
कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. मृत्यूदर हा 3.43 टक्‍के झाला असून, तो कमीत कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाला काम करावे लागणार आहे. 


नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या 50 टक्‍के लोक मास्कच वापरत नसल्याचे दिसते. तर जे लोक मास्क वापरतात त्यातील पुन्हा 25 टक्‍के लोक नाकाच्या खाली मास्क लावतात. त्यामुळे कोरोना थांबणार कसा? म्हणूनच नियमांचे पालन केले नाहीतर कोरोनाचे हे संकट मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्ह्याची दुसऱ्या लाटेकडे वाटचाल; बाधितांच्या संख्येत चारपटीने वाढ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com