राज्यात कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने 'यात' मारली बाजी....

The kolhapur district police force took part in the CCTNS operation
The kolhapur district police force took part in the CCTNS operation

कोल्हापूर - पोलिस ठाण्याचे दैनंदिन ऑनलाईन सीसीटीएनएस कार्यप्रणालीत संपूर्ण राज्यात जिल्हा पोलिस दलाने बाजी मारली. दाखल गुन्ह्यांचे निर्गतीकरण, बेवारस मृत, वाहनांचा तपास अशा विविध कामांत उल्लेखनीय कार्याचे हे फलित ठरले. गेल्या वर्षभरात आठ वेळा पहिल्या तीनमध्ये संगणक कक्षाने हे यश संपादन केले आहे. 

‘सीसीटीएनएस’त पहिल्या तीनमध्ये स्थान; गुन्हे निर्गतीचे यश 

जिल्हा पोलिस दलाचे संपूर्ण काम २०१६ मध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. याचे संपूर्ण नियंत्रण पोलिस मुख्यालयात सीसीटीएनएस प्रशिक्षण केंद्राकडून केले जाते. ठाण्याची दैनदिनी, प्रथम खबरी अहवाल, गहाळ दाखले, प्रतिबंधक कारवाई, मयत, आगीच्या घटना, अदखलपात्र गुन्हे, गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्यांची, त्यांच्या गावांची अशा सर्व प्रकारची माहिती सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये नोंद केली जाते. या प्रणालीद्वारे जिल्ह्यातील पोलिस दलाला गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती ऑनलाईन अपडेट उपलब्ध होते. त्यामुळे पोलिसांच्या वेळेची व श्रमाची बचत होते. त्याचा उपयोग गुन्हे निर्गितीला होतो. या माहितीच्या आधारे नागरिकांना त्यांचे बेपता झालेले नातेवाईक, चोरीला गेलेली वाहने चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केली आहेत का? याची माहिती घेता येते. 

पहिल्या तीन क्रमांकात आठ वेळा येण्याचा मान

ऑनलाईन कार्यप्रणालीला गती येण्यासाठी अपर पोलिस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्या कार्यालयामार्फत मासिक स्पर्धा घेतली जाते. ४८ जिल्ह्यांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभागाला गौरविण्यात येते. यासाठी डाटा नोंदणीसाठी १३५ गुण, ई तक्रारीसाठी १२, प्रतिबंधक कारवाईला पाच, गुन्हे प्रकटीकरणाला १०, मृत व बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी १० गुण असे निकष आहेत. या स्पर्धेत गतवर्षी पहिल्या तीन क्रमांकात आठ वेळा येण्याचा मान मुख्यालयातील सीसीटीएनएस कक्षाने मिळवला. राज्यात उल्लेखनीय कार्य करणारा हा विभाग पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. याची धुरा सहायक फौजदार दिलावर शेख, पोलिस कॉन्स्टेबल सुदर्शन वर्धन, ललिता दंडगे, पोलिस नाईक कविता पाटील आणि स्पॉप्टवेअर इंजिनिअर वृषाली कुलकर्णी, स्वप्नील गोते हे यशस्वीरित्या 
सांभाळत आहेत. 

‘शोधा व विचारा’ पर्यायाची मदत 

ऑनलाईन प्रणालीतील ‘शोधा व विचारा’ या पर्यायांतर्गत सन २०१९ मध्ये २१ बेवारस मृतांची ओळख पटली. पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केलेली १४ वाहने नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. तसेच, २६ बेपत्ता व्यक्तींना संबंधित नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याचे सहायक फौजदार दिलावर शेख यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com