चोरट्यांनी साधली दिवाळी; सलग दोन घरफोड्यामुळे ग्रामस्थ भयभीत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

चोरट्यांच्या हाताला काही लागल नाही.चोरटे मागील दरवाज्याने पसार झाले.

गांधीनगर : सरनोबतवाडी (ता करवीर) येथे अज्ञात चोरट्यांनी केलेल्या दोन घरफोडीत सोन्याचांदीसह रोख रक्कम मिळून सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सलग दोन घरफोड्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 

निवृत्त आर्मी अधिकारी पद्मनाभ अनंतराव पंडितराव यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरी कोणी नसताना ही चोरी केली. एक लाख 52 हजार रोख रकमेसह सोन्याचे गंठण, सोनसाखळी, कर्णफुले, चांदीची वाटी, हिरेजडित मनी व सोन्याच्या बांगड्या असा एकूण मिळून 2 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबतची फिर्याद पद्मनाभ अनंतराव पंडितराव रा. पार्वती पार्क सरनोबतवाडी) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत.

दुसऱ्या सरनोबतवाडी येथेच वैभव बालिकानंद फोन्डेकर (रा. पार्वती पार्क) यांच्या बंगल्यात चोरी झाली. घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्यानी ही चोरी केली. फोडेकर यांचा प्रकाशन व्यवसाय आहे. ते व्यवसायानिमित्त बाहेर गेले असताना ही चोरी रविवारी पहाटे चारच्या दरम्यान झाल्याचे समजते. अज्ञात तिघेजण चोरी करून पसार होत असताना एका शेजाऱ्यांनी पाहिले. याशिवाय या पार्क मध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे तिघे चोरटे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनसाखळी, अंगठी व 36 हजारांची रोख रक्कम असा 70 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत वैभव फोन्डेकर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार विजय मुंदाळे करीत आहेत.

हेही वाचा- काळाचा घाला; गोकाकजवळील अपघातात कोल्हापुरातील एकाच कुटुंबातील चौघे ठार; दोन मुले गंभीर जखमी

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या पार्वती पार्कमध्ये डाँ वैभव फोंडेकर यांचा बंगला आहे.ते मुळचे गोव्याचे असुन त्यांचा प्रकाशनाचा व्यवासाय आहे.ते इथ येवुन जावुन करतात.तर याच पार्कमध्ये रमजान दिलावर बारगीरही राहतात. ते कुटुंबासह तासगांव येथे गेले होते.तर फोंडेकरही गोव्यात होते.त्यामुळ हे दोन्ही बंगले बंद होते. गांधीनगर पोलीस ठाण्याची गस्थीपथक गाडी येवुन गेल्यानंतर चड्डी बनीयन घातलेले तीन चोराट्यांनी पहाटे चार वाजता फोंडेकर यांच्या बंगल्याचा कडी कोयंडा उचकटुन आत प्रवेश केला. दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीचा दरवाजा उचकटुन त्यातील अंगठी आणि चेन असे एक तोळ्याचे दागिने आणि रोख 34 हजार रुपये घेवुन चोरट्यांनी बारगीर यांचा बंगला गाठला.त्याही बंगल्याचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला.

तिथल्या तिजोरीचा दरवाजा उचकटुन शोधाशोध केली पण चोरट्यांच्या हाताला काही लागल नाही.चोरटे मागील दरवाज्याने पसार झाले. हे चोरटे सीसीटीव्ही कँमेरात कैद झाले आहेत.या घटनेची माहीती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे स पो नि.दिपक भांडवलकर कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur gandhinagar case thief housebreaker in diwali festival