राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

तालुक्यातील 98 पैकी नुकत्याच निवडणूक झालेल्या व पुढे होणाऱ्या निवडणुकीच्या सरपंचपदाची अरक्षणसोडत आज तहसील कार्यालयात काढण्यात आली

राधानगरी - तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आज सोडत झाली. पैकी साठ ग्रामपंचायतीची सरपंचपदे खुली राहिली आहेत. यात सर्वसाधारण महिला तीस व सर्वसाधारण पुरुष तीस पदे आहेत. इतर मागासवर्गीय महिलांसाठी चौदा, अनुसूचित जाती महिलासाठी पाच तर इतरमगासवर्गीय पुरुष तेरा आणि अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी तेरा सरपंचपदे आरक्षित झाली आहेत.
 

तालुक्यातील 98 पैकी नुकत्याच निवडणूक झालेल्या व पुढे होणाऱ्या निवडणुकीच्या सरपंचपदाची अरक्षणसोडत आज तहसील कार्यालयात काढण्यात आली. तहसीलदार मीना निंबाळकर अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी सभापती सुशीला भावके, उपसभापती मोहन पाटील, सदस्या सोनाली पाटील, वनिता पाटील, नायब तहसीलदार विजय जाधव, पोलीस निरीक्षक उदय डुबल, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील, निवडणूक विभागाचे रणजित ढोकरे आदी उपस्थित होते. 

    
प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण असे 

अनुसूचित महिला- म्हासुर्ली, दुर्गमानवड, केळोशी बुद्रुक, आकनूर, शिरसे, 

अनुसूचित जाती पुरुष :
तुरंबे, मोघर्डे, सोळंकुर,मालवे, येळवडे,सावर्दे- वडाचीवाडी, 
इतर मागासवर्गीय महिला :
मौजे कासारवाडा, पुंगाव, तरसंबळे. आवळी बुद्रुक, चांदे, घुडेवाडी, पडसाळी,वलवण, पंडेवाडी, पिरळ- सावर्धन, कसबा तारळे, राजापूर, आडोली, चांदेकरवाडी.

इतर मागासवर्गीय पुरुष केळोशी खुर्द, मोहडे, करंजफेन, मांगेवाडी, बरगेवाडी, कपिलेश्वर, कौलव, कोदवडे, रामनवाडी,न्यू करंजे, हसणे, चंद्रे,पनोरी. 

सर्वसाधारण महिला : 
खामकरवाडी, मुसळवाडी, बनाचीवाडी, धामोड, फराळे, शेळेवाडी, ऐनी, कंथेवाडी, कसबा वाळवे,कासारपुतळे, माजगाव,मजरे कासारवाडा,नरतवडे,फेजीवडे,सो.शिरोली,बुरंबाळी, राशिवडे बुद्रुक,गुडाळ-गुडाळवाडी, खिंडी व्हरवडे, सावर्डे पाटणकर,अर्जुनवाडा, बुजवडे, शेळेवाडी,वाघवडे, टिटवे, तारळे खुर्द, आमजाई व्हरवडे,धामणवाडी, मालवे,पाटपन्हाळा, 

हे पण वाचा शिवसैनिकांची पाठिंब्यावरच महानगरपालिकेवर भगवा फडकविणार  

सर्वसाधारण पुरुष :
आणाजे, आटेगाव, चाफोडी तर्फ ऐनघोल, चकरेश्वरवाडी,ढेंगेवाडी, कारीवडे कुडूत्री, कुंभारवाडी,मल्लेवाडी, सुळंबी, तळाशी, ठिकपुर्ली, राशिवडे खुर्द, आपटाळ,बारडवाडी, कांबळवाडी, पडळी,पालकरवाडी, राधानगरी, शिरगाव, चाफोडी तर्फ तारळे, घोटवडे, आवळी खुर्द, गवशी, कोनोली तर्फ असंडोली, कोते,मांगोली, सरवडे,पिंपळवाडी, तळगाव.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur radhangari taluka gram panchayat reservation