कोल्हापूर जिल्ह्यात 3 मेपर्यंत लॉकडाउन कायम राहणार

कोल्हापूर जिल्ह्यात 3 मेपर्यंत लॉकडाउन कायम राहणार
Updated on


कोल्हापूर : कोरोना विषाणू (कोव्हिड-19)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यात 3 मे 2020 ला रात्री बारापर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी कायम राहील, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या 22 व 23 मार्चच्या आदेशानुसार घालण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या 17, 21 व 23 एप्रिलच्या आदेशानुसार प्रतिबंधित बाबी तसेच निर्बंधामधून वगळण्यात आलेल्या अत्यावश्‍यक सेवा व जीवनावश्‍यक बाबी कायम राहतील, असे या आदेशात म्हटले आहे. 
जिल्हाधिकारी हे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. 
सद्यपरिस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भादंसं 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil Gokul Election Rajarshi Shahu Samvichari Aghadi
Shiv Sena UBT complaint against Rajesh Kshirsagar
Will Rinku Desai lose his corporator post?
Malhar Rao Holkar's Reign Documented
Marathi News Esakal
www.esakal.com