'महाराष्ट्र केसरी'चा शड्डू जानेवारी किंवा फेब्रुवारीत घुमणार? शरद पवार यांचा पाठपुरावा 

The Maharashtra Kesari Wrestling Championship is likely to be held in January or February
The Maharashtra Kesari Wrestling Championship is likely to be held in January or February

कोल्हापूर : कुस्ती क्षेत्रातील मानाची 'महाराष्ट्र केसरी' किताबाची स्पर्धा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि प्रायोजक देखील सकारात्मक आहेत. स्पर्धा आयोजनाबाबत शासनाची परवानगी मिळावी, यासाठी परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारी २०२१ ला स्पर्धा होतील असे संकेत आहेत. परिषदेच्या सोशल मीडिया टीमचे गठन करण्याचा निर्णय कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकाद्वारे दिली.

कोरोना माहामारिमुळे सर्व राज्यस्तरीय स्पर्धा बंद आहेत. या पूर्ववत सुरू करण्यासाठी महासंघ आणि परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. शासनाने अनुकुलता दर्शवली तर त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्पर्धा घेण्यासाठी परिषद तयार आहे. ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा. यासाठी परिषदने भारतीय कुस्ती महासंघाचे माध्यमातून केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. यासाठी महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषणसिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे पत्रकात म्हणले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, दयानंद भक्त, हनुमंत गावडे, सुरेश पाटील, प्रा. बंकट यादव, कार्यकारणी सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली.

स्पर्धेच्या प्रवेशिका आता ऑनलाईनच

परिषदेची अधिकृत वेबसाईट कार्यन्वित झाली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व स्पर्धेच्या प्रवेशिका ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शहर जिल्हा तालिम संघाने सुचवलेले एक वेबसाईट मॅनेजर दोन सोशल मीडिया प्रतिनिधीची नियुक्ती परिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध मैदानासाठी परिषद मोफत अधिकृत पंच देणार 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुस्ती मैदानांसाठी अधिकृत पंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे मार्फत मोफत देण्यात येतील जेणेकरून पैलवानांना होणारी दुखापत रोखता  येईल व भविष्यातील हानी टळेत. तसेच फेसबूक व यूट्यूब पेज वरून हे मैदान मोफत लाईव्ह दाखविण्यात येईल. तसेच परिषदेच्या कायदेशीर बाबीसाठी कुस्ती क्षेत्रातील वकिलांचे कायदेशीर सल्लागार समितीचे पॅनेल गठीत करण्याचा ठराव देखील सर्वानुमते घेण्यात आला. मुलांच्या राज्यस्तरीय अजिक्यपद स्पर्धेप्रमाणे वरिष्ट गट महिला 15,17,20,23 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा देखील प्रायोजकाच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय यावेळी झाला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com