इराणवरून आलेल्यास कोरोना नाही

इराणवरून आलेल्यास कोरोना नाही
Updated on: 

कोल्हापूर ः इराणला गेलेली आणि तीन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आलेल्या नागाळा पार्क परिसरातील त्या व्यक्तीचा कोरोना स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, मिरज येथील शासकीय प्रयोगशाळेत केलेल्या पुनर्तपासणीत या व्यक्तीचा कोरोना स्वॅब निगेटिव्ह आल्याने तो कोरोनाग्रस्त नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे विषाणू परीक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित केली आहे. तेथे कोरोना स्वॅब तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या प्रयोगशाळेत पहिल्या चाचणीचा भाग म्हणून पहिले दहा स्वॅब तपासणी केल्यावर यात नऊ स्वॅब निगेटिव्ह आले, तर एक स्वॅब पॉझिटिव्ह आला, मात्र सीपीआर प्रशासनाने हे सर्व स्वॅब नव्याने तपासणी करण्यासाठी पुणे व मिरज येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यात जो स्वॅब पॉझिटिव्ह आला होता. त्याचे पुनर्परीक्षण केले. त्यानुसार त्याचा स्वॅब निगेटिव्ह आला. त्यामुळे संबंधित व्यक्तीने समाधान व्यक्त केले; मात्र पुन्हा तपासणी होईपर्यंत संबंधित व्यक्तीला सीपीआर रुग्णालयात क्वारंटाईन व्हावे लागले. 

प्लाझ्मा देण्याची तयारी 
कोरोना चाचणी स्वॅब निगेटिव्ह आल्याची माहिती मिळताच संबंधित कोरोना निगेटिव्ह व्यक्तीने स्वतःहून प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार अन्य वैद्यकीय प्रक्रिया चाचणी करून संबंधित व्यक्तीचा प्लाझ्मा घेण्याविषयी सीपीआर आरोग्य यंत्रणा लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती संबंधित व्यक्तीने दै. "सकाळ'शी बोलताना दिली. 

अखेर चाचणी निगेटिव्ह 
संबंधित व्यक्तीने सुरवातीलाच आमची तपासणी झाली आहे. कोरोना नसल्याचे सांगत तपासणी मिरज येथून करण्याची मागणी केली होती. तेव्हा सीपीआर वैद्यकीय यंत्रणेसोबत वादही झाला होता. त्यानुसार सीपीआर प्रशासनानेही त्यांच्या मागणीनुसार पुनर्तपासणी केली. यात संबंधित व्यक्‍तीचा स्वॅब निगेटिव्ह आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com