
जोतिबा मालिका बंद करण्यासाठी जोतिबा डोंगरावर ग्रामस्थ पूजारी यांची बैठक ...
जोतिबा डोंगर: दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत मूळ चरित्राच्या विसंगत चित्रिकरण दाखवले जात असल्याने मालिका चित्रीकरण थांबवून ते योग्यरित्या आणि केदारविजय व इतर जोतिबादेवाचे महात्म्य सांगणारे ग्रंथ यांचे संदर्भ लक्षात घेऊन करावे. अन्यथा मालिका बंद करा व मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन वर गुन्हा दाखल करण्यात यावा या बाबत ग्रामस्थ पुजारी यांच्या झालेल्या बैठकीत निर्धार करण्यात आला .बैठकीला सरपंच राधा बुणे उपसरपंच शिवाजीराव सांगळे ,दहा गावकर प्रतिनिधी विश्व्वशक्ती मंडळाचे पदाधिकारी कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे हे प्रमुख उपस्थित होते .
यावेळी या बैठकीत बोलताना, पूजारी म्हणाले, या मालिकेत
पौराणीक धार्मिक मुळ कथा कोठे दिसत नाही ती बाजुला गेली असून, कुठे त्याचा संदर्भ लागत नाही. या पुर्वी कोठारी व्हिजन व पुजारी, ग्रामस्थ यांच्यात मालिके विषयी चर्चा झाली होती. हि कथा धार्मिक संबध बिगडू नये म्हणून पौराणीक अभ्यासक, संशोधकाना, ग्रामस्त यानां या मालिकेतील लेखन व त्याचे सविस्तर भाग दाखवून प्रसारित केली जाईल अशी ग्वाही महेश कोठारे यांनी देवाच्या दारात येऊन दिली होती पण त्यांनी अशा प्रकारे कोणताही शब्द पाळलेला नाही व काही केलेले नाही.
देवी देवतांचा ऐकेरी उल्लेख,रानटी भाषेतील संवाद, देवाच्या पायात चप्पल, गळ्यात कवड्याच्या माळा, कपाळी मळवट, यमाई, चोपडाई यांचे लहान रुप, केदानाथाचा जन्म हे सर्व चुकीचे दाखविले आहे. या सर्व गोष्टी वस्तू रुपाला धरुन नाहीत. आताच्या जगात मनोरंजन म्हणून मोबाईलवर रिंग टोन वाजवण्याचे साधन अाहे. मार्केटिंगची या पद्धती या मालीके मध्ये वापरली अाहे. असे ही काही पूजाऱ्यांनी सांगीतले .
या वेळी वयस्कर पूजारी , तरुण ,अभ्यासक यांनी आपाआपली मते कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या कडे मांडली. तसेच मालीकेच्या निर्मात्यावर विश्वशक्ती तरुण मंडळ जोतिबा ,सरपंच उपसरपंच , पूजारी ग्रामस्थाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात अाली व पुढील दिशा ठरवण्यात आली. या बैठकीला , पुजारी, अभ्यासक, विश्वशक्ती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे.