
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री यांना लागण झाली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून त्यांनी ही माहिती दिली आहे.
सांगली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणामध्ये धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसापूर्वी कोकणामध्ये एकाच वाढीमध्ये 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोल्हापूर मध्ये देखील आता काही पेशंट सापडू लागले आहेत. काही दिवसापूर्वीचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. आणि आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लागण झाली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून त्यांनी ही माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे,...
Posted by Jayant Patil - जयंत पाटील on Wednesday, February 17, 2021
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे.
संपादन- अर्चना बनगे