
त्या आंदोलनात महाराष्ट्रातून सुमारे तीनशे शेतकरी सहभागी झाली आहेत.
नवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात महाराष्ट्रातून सुमारे तीनशे शेतकरी सहभागी झाली आहेत. प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही असा पवित्रा घेऊन शेतकरी या लढ्यात उतरला आहे.
महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, नाशिक, जालना ,पूर्णा, औरंगाबाद ,चोपडा ,सांगली, कोल्हापूर या भागातून ही शेतकरी या आंदोलनात दाखल झाले आहेत. प्रामुख्याने पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सर्वजण दिल्ली सीमेवर दाखल झाले आहेत. पोलिसांना त्यांना अडवून मोतीबाग येथे स्थानबद्ध केले आहे. दोन दिवस त्रास झाला परंतु पुन्हा तो बंद झाला आहे. सध्या कोणाला ही अटक केली नाही. सध्या दिल्ली ते चंदीगड, दिल्ली ते आग्रा, दिल्ली ते गाजियाबाद, दिल्ली ते रोहतक रोड हायवे शेतकर्यांनी ब्लॉक केले आहेत.
हेही वाचा - ब्रेकिंग - अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा झाला लिलाव ; सर्वाधिक बोली लावून स्थानिकांकडून खरेदी -
केंद्र सरकारने अद्याप हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. बुराडी मैदानात येऊन आंदोलन करावे अशा सूचना सरकारने पोलिसांमार्फत आंदोलकांना दिले आहेत. परंतु रस्त्यावर आंदोलन करू, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. पंजाब मधील एकतीस शेतकरी व देशातील प्रमुख संघटनांचे शिवकुमार करा जी, जगामीन दलेवाल ,बलवीर राजेवाल गुरुनाम सिंग चंदोली अशी 36 लोकांची समिती तयार केली आहे. सरकारने यातील पाच जणांना चर्चेसाठी या, असा निरोप पाठविला आहे. परंतु छत्तीस लोकांच्या बरोबरच बैठक घ्या, असा पवित्रा शेतकरी संघटनानी घेतला आहे. सरकारने उद्या या सर्वांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे. यात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लोक चार महिने तळ देऊन थांबायचे या तयारीने आले आहेत. संपूर्ण शिधा सामग्री कपडे घेऊन आले आहेत. ट्रक्टर, ट्रोल्यानं आडवे तट्टे बांधून निवारा केला आहे. शीख व इतर सामाजिक संघटना नाश्ता, कोलगेट, पाणी यांचे आंदोलकांना वाटप करीत आहेत. शीख गुरुद्वारामध्ये लंगर सेवा (अन्नछत्र) आहे. सकाळ-संध्याकाळ त्याचा लाभ आंदोलकांना दिला जात आहे. जाचक कृषी कायदे रद्द करा व कांदा बटाटा पिकांना एम. एस. पी. लागू करा या प्रमुख मागण्या आंदोलकांच्या आहेत.
"प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही. या इराद्याने शेतकरी या आंदोलनात उतरले आहेत."
- संदीप गिड्डे आंदोलक शेतकरी
हेही वाचा - कोरोनामुळे रद्द झालेल्या परीक्षांच्या निकालाचे चित्र लवकरच होणार स्पष्ट -
संपादन - स्नेहल कदम