अन्... मुस्लिम व्यक्तीच बनला मठाचा उत्तराधिकारी....

The Muslim man became the successor of the monastery
The Muslim man became the successor of the monastery
Updated on

बंगळूर - धर्म आणि परंपरेच्या नावाखाली सहिष्णुता आणि असहिष्णुतेचा मुद्दा देशपातळीवर उचलून धरत एकीकडे अराजकता माजविण्यावर काहीजण भर देत असतानाच गदगमधील मठाने मात्र एका मुस्लिम विवाहित व्यक्तीलाच मठाचा उत्तराधिकारी घोषित केले आहे. धर्म आणि भाषेच्या पलीकडे वेद आणि आध्यात्म असल्याचे मठाने दाखवून दिले आहे.

 बसवेश्‍वरांच्या तत्त्वांमुळे प्रभावित रहीमसाब मुल्लांकडून इष्टलिंग धारण

बसवेश्‍वरांच्या तत्त्वसिद्धांतामुळे प्रभावित झालेल्या रहीमसाब मुल्ला यांनी इष्टलिंग धारण केले आहे. रोण तालुक्‍यातील असुट्टीहळ्दळी कोणेश्‍वर शांतीधाम मठाचे मठाधीश म्हणून त्यांची यामुळे नियुक्ती झाली आहे. ३३ वर्षीय रहीमसाब आता ‘दिवाण शरीफ’ म्हणून संबोधित केले जात आहे. बसवेश्‍वरांप्रती असलेली निष्ठा आणि मुरुगराजेंद्र मठामुळे प्रभावीत होऊन त्यांनी बसवेश्‍वेरांनी रचलेल्या वचनांचा जप करून लिंगदिक्षा घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून ते लिंगायत पंथ व बसवेश्‍वरांच्या शिकवणीचे तत्व आत्मसात 
करीत आहेत.

कुटुंबाची निष्ठा लक्षात घेऊन त्यांना मठाधीश घोषित

शरीफ यांना चार मुले आहेत. त्याचे वडील रहीमसाब आणि आई फातिमा हेही कोणेश्वर मठाचे भक्त आहेत. शरीफ यांनीही आई- वडिलांप्रमाणेच कोरेश्‍वर मठाची दीक्षा घेतली. पूर्वी मठाच्या बांधकामासाठी त्यांनी जमीन दान केली होती. आता त्यांच्या गावाच्या बाहेरील बाजूस एक नवीन मठाची उभारणी होतआहे. कोणेश्‍वर मठाबद्दल या कुटुंबाची निष्ठा लक्षात घेऊन त्यांना मठाधीश घोषित करण्यात आले आहे. कोणेश्‍वर मठाला गुलबर्गा येथील खजुरी गावातल्या ३५० वर्षे जुन्या कोरेश्वर मठ तसेच चित्रदुर्गातील श्री जगद्‌गुरू मुरुगराजेंद्र मठाची मान्यता प्राप्त आहे.

जात आणि धर्माच्या पलीकडे बसवेश्‍वरांची तत्त्वे आहेत, हे मला सर्वांना दाखवून द्यायचे आहे. माझे कुटुंबही मठाचे अनुयायी आहे. त्यामुळे मी माझा निर्णय त्यांना सांगितल्यावर त्यांनीही त्यासाठी होकार दिला. नव्या मठाची जबाबदारी माझ्यावर आहे. ती चांगल्याप्रकारे मी निभावणार आहे. ‘कायकवे कैलास’ (काम हेच कैलास) हे बसवेश्‍वरांचे तत्त्व आचरणात आणणार आहे.
-दिवाण शरीफ, मठाधीश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com