जयंत पाटील म्हणतात मलाही मुख्यमंत्री व्हायचं, अजितदादा म्हणाले माझा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण,

सांगली:  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  एका  चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली.  मुख्यमंत्री होण्याचे सगळे  गुण तुमच्याकडे आहेत . तरीही तुम्हाला सतत हे  पद हुलकावणी देत का ..?  त्यावर बोलताना पाटील म्हणाले,”आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही.

माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. सर्वांना वाटतं कि आपण मुख्यमंत्री व्हावं, तशी माझीही इच्छा आहे. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलची मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.जयंत पाटील यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. 

अजित पवारांचा जयंत पाटील यांना पाठिंबा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेविषयी विचारले. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'माझा त्यांच्या इच्छेला पाठिंबा आहे' सध्या जयंत पाटील यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा- नवीन योजना आलीया सजना, बघा जरा न्याहाळून नीट, टाका तुम्ही पाईपलाईन थेट...’

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp state president jayant patil speech viral in social media sangli political news