कोरोनाग्रस्त मृतदेहावर  थेट अंत्यसंस्काराची गरज 

कोरोनाग्रस्त मृतदेहावर  थेट अंत्यसंस्काराची गरज 
Updated on

कोल्हापूर : शहरातील कोरोनाचा समूह संसर्ग कमी करण्यासाठी कोरोनामुळे किंवा कोरोना कक्षात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट रुग्णालयातून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्याची गरज आहे. शहरात दहा-बारा दिवसात कोरोनाच्या निम्म्याहून अधिक रुग्णांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन सक्तीने कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी नेण्याची उपाययोजना करावी. 
शहरातील गंजीमाळ परिसरात महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गर्दी झाली. या गर्दीतील संबंधित महिलेच्या नात्यातील लोकांसह सुमारे 20 ते 22 लोकांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अशीच स्थितीत कदमवाडी येथील एका व्यक्तीच्या मृतदेह घरी नेल्यानंतर पाहायला मिळाली. बावड्यात तर एका तरुणाचा मृतदेह डॉक्‍टरांनी घरी नेऊ नका, असे सांगूनही घरी नेला, या मृतदेहावर पडून महिला आणि नातेवाईक रडले, यातील सातजण पॉझिटिव्ह आले. ही काही प्रातिनिधीक उदाहरणे आहेत, पण यातून कोरोनाचा समूह संसर्ग झाल्याचे आढळले आहे. 
आज शहरात सरकारी आणि खासगी रुग्णालयातही पुरेसे बेड नाहीत. दुसरीकडे रोज रुग्णांच्या किंवा कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत नव्याने येणाऱ्या रुग्णांना बेड मिळत नाहीत. काल हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झालेल्या नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या वाट्यालाही सीपीआरमध्ये हीच स्थिती आली. बेड उपलब्ध होईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. 

महापालिकेने 
पुढाकार घ्यावा 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह व्यवस्थित प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून, शरीराचा कोणताही भाग दिसणार नाही, असा दिला जातो, मृतदेह दिल्यानंतर संबंधितांना तो घरी न नेण्याची सूचनाही केली जाते; पण त्याचे पालन होत नसल्याचे आतापर्यंत दिसून आले. यासाठी महापालिका प्रशासनानेच पुढाकार घेऊन कोरोनाग्रस्त मृतदेह थेट स्मशानभूमीत नेण्याची सक्ती करण्याची गरज आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Naikwadi Waterfalls Tourism
Kolhapur Honey Production News
Gokul election 2026 Arun Dongale
Kolhapur Ganeshotsav
Marathi News Esakal
www.esakal.com