पन्हाळ्याचा 'तो' भेगललेला रस्‍ता तंदुरुस्‍त होतोय पण....

need to reconstruct the rod of panhalgad kolhapur
need to reconstruct the rod of panhalgad kolhapur
Updated on

पन्‍हाळा - अति पावसाने आणि वरून पाणी मुरुन आल्‍याने जमीनच सरकून पन्‍हाळगडी येणारा मुख्‍य रस्‍ता गेल्या वर्षी 4 ऑगस्टला खचला,दरडीचे दगड कोसळून रस्‍ताच तब्‍बल चार महिने बंद झाला,सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या अधिका-यांनी तातडीने लक्ष घालून खचलेला रस्‍ता दुरुस्त करत रस्‍ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला. पण...

मध्‍यंतरी झालेल्‍या दोन दिवसाच्‍या जोरदार वादळी पावसात भर घालून वाढवलेला रुंदीकरणाचा भाग खचला, त्‍या ठिकाणच्‍या रस्‍त्‍याला भेगा पडल्‍या आणि पुन्‍हा हा भेगलेला भाग दुरुस्‍त करण्‍याची वेळ आली.

या रस्‍ता दुरुस्‍तीबरोबरच आता पुन्‍हा रस्‍ता खचून खाली सरकू नये म्‍हणून गॅबिन वॉलच्‍या खालच्‍या बाजूस आर.सी.सी भिंत उभारण्‍याचे काम चालू आहे. दरडीतून वाहात येणारे पाणी गटारी शेजारी मुरु नये म्‍हणून गटारीच्‍या बाजूने सिमेट कॉक्रिट टाकण्‍यात येत आहे. वाहन धारकांना धुक्‍यात, अंधारात रस्‍ता कळावा म्‍हणून रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूने लाल रंगाचे डेललेटर तसेच गार्डस्‍टोन बसवण्‍याचे काम युध्‍द पातळीवर चालू आहे. पावसाळयात रस्‍ता पूर्णपणे तंदुरूस्‍त ठेवण्‍यासाठी आवश्‍यक ते सर्व प्रयत्‍न सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडून चालू आहेत, पण जेथून पाणी मुरुन येते, त्‍या रेडेघाट परिसरातील गटार अद्याप पूर्णपणे काढून झालेली नाही.विठोबा माळावर साचणारे तळीतील पाणी तटबंदीत मुरुन तटबंदीचे जांभी आणि शाडूचे मोठमोठे ढपले ढकलून देते. त्‍या पाण्‍याचा बंदोबस्‍त अद्याप न झाल्‍याने सध्‍या सुरु असलेल्‍या पावसाने लता  मंगेशकर बंगल्‍याकडून पावनगडाकडे जाणा-या रस्‍त्‍यावर वरून ढपले पडले आहेत. काही ढपले दरीकडेच्‍या बाजूला लावलेल्‍या संरक्षक रेलिंगना तटून राहिल्‍याने खालच्‍या मुख्‍य डांबरी रस्‍त्‍यावर आलेले नाहीत.विठोबामाळ, रेडेघाट,मार्तंड परिसरातील पाणी वरच्‍या वरती जोपर्यंत वाहून जाण्‍याची व्‍यवस्‍था होत नाही.

हे होणे गरजेचे..

  • विठोबा माळावरील पाणी  दुसरीकडे कसे काढता येईल हे पाहणे गरजेचे.
  • रेडेघाट, मार्तंड परिसरातून येणा-या पाण्‍याला वाट काढून देणे गरजेचे.
  • गुरुवारपेठेतून मार्तंड परिसरात जाणा-या रस्‍त्‍यावर पडलेल्‍या भेगा मुजवणे आवश्‍यक.
  • सुटलेल्‍या दगडी शिळा घसरू नयेत म्‍हणून त्‍या अडवणे आवश्‍यक.

रेडेघाटी कडील  रस्‍त्‍यावर येणारे पाणी जेसीबीच्‍या सहाययाने गटार काढून त्‍यातून हे पाणी रेडेघाटीकडे सोडण्‍यात येणार आहे,त्‍यामुळे वरून येणारे पाणी परिसरात मुरणार नाही आणि धोका होणार नाही....
    -  सौ.रुपाली धडेल - नगराध्‍यक्षा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com