शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हवे....

needs of separate competitive examination guidance center in Shivaji University needs
needs of separate competitive examination guidance center in Shivaji University needs

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा अपुरी पडत असल्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अभ्यासिका व राज्यसेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेशासाठी शेकड्याने अर्ज येत असताना, केवळ २६० विद्यार्थ्यांना जागा मिळते. उर्वरित विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसोय होते. स्वतंत्र एमपीएससी व यूपीएससी मार्गदर्शन केंद्र उभारल्यास जागेचा प्रश्‍न सुटू शकणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यास चालना दिल्यास विद्यार्थ्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

ग्रंथालयातील अभ्यासिकेत १२० विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे. जागेसाठी त्यांच्यात वाद टोकाला पोचायचा. हाणामारीचे प्रसंग घडल्यानंतर नव्या अभ्यासिकेची मागणी झाली. अभ्यासिकेच्या नव्या इमारतीत १६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. येणाऱ्या अर्जांचा आकडा पाचशेहून अधिक असतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्रात गुणवत्ता याद्यीनुसार शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेश परीक्षेकरिता पाचशे विद्यार्थी अर्ज करतात. नियमित लेक्‍चर्स होत असल्याने विद्यार्थ्यांना केंद्रातील प्रवेश महत्त्वाचा असतो. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी, विचारवंत यांच्या व्याख्यानांना केंद्राबाहेरील विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी दिली जाते. 

विद्यापीठात जागेची कमतरता नाही

प्लेन बिल्डिंगमध्ये विद्यापीठातील अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयातील बी. ए, बी. कॉम, बी. एस्सीसह व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिला जातो. दोनशे जागांसाठी प्रथम येणाऱ्यास संधी हे तत्त्व येथे पाळले जाते. नवी अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश न मिळालेले काही विद्यार्थी येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. प्रवेश घेऊनही प्लेन बिल्डिंगमध्ये अभ्यासाला काही विद्यार्थी येत नाही. त्याचा फायदा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मिळतो. 
सुरक्षारक्षकांकडून या विद्यार्थ्यांना बसण्यास परवानगी नाकारण्यावरून वाद होतो. आजच्या स्थितीत स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. विद्यापीठात हजारावर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांच्यासाठी एमपीएससी व यूपीएससी सेंटरमध्ये होऊ शकते. इमारत बांधण्यासाठी विद्यापीठात जागेची कोणतीच 
कमतरता नाही. 

विद्यापीठात एमपीएससी, यूपीएससी सेंटर उभे करून १०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची सोय करता येणे शक्‍य आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा ‘यूपीएससी’त टक्का कमी आहे. तो वाढण्यास सेंटर महत्त्वपूर्ण ठरेल. 
- डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ

आजी-माजी विद्यार्थ्यांनी एमपीएससी-यूपीएससीत यश मिळविल्यावर विद्यापीठाचा लौकिक वाढणार आहे. विद्यापीठाने सेंटरची आवश्‍यकता गांभीर्याने लक्षात घ्यावी. सेंटरसाठी प्रशस्त इमारत बांधून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश द्यावा. 
- गिरीश फोंडे, ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com