मिठाई खाताय ? ‘बेस्ट बिफोर' पाहताय का ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

त्यामुळे नागरिकांना चांगल्या प्रकारची मिठाई मिळण्यास मदत होईल.

बेळगाव : शहर आणि परिसरातील स्वीट मार्टमधील वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईच्या लेबलवर ‘बेस्ट बिफोर’ असा उल्लेख करण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या प्रकारची मिठाई मिळण्यास मदत होईल. स्वीट मार्ट चालकांसह नागरिकांतूनही याचे स्वागत केले जात आहे.

यापूर्वी मिठाई किती दिवस खाण्यायोग्य आहे, याबाबतची माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे मिठाईच्या दर्जाबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर एफएसएसआयने एक ऑक्‍टोबरपासून मिठाईच्या लेबलवर बेस्ट बिफोर असा उल्लेख करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शहरातील स्वीट मार्टमध्ये बेस्ट बिफोर असा उल्लेख पहावयास मिळत असून ग्राहकांनीही बेस्ट बिफोर असा उल्लेख आहे की नाही, याबाबत खातरजमा करुन घेतली पाहिजे.

हेही वाचा - मी नवदुर्गा : बेवारस आणि गरीब रुग्णांवर स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार करणाऱ्या बेळगावच्या रणरागिणीची कहाणी -

तयार करण्यात आलेला पदार्थ कधी बनविला आहे? तो पदार्थ किती दिवस चांगला राहू शकतो, हे बेस्ट बिफोर असा उल्लेख केल्यामुळे समजण्यास मदत होणार आहे. आपण खालेल्या पदार्थामुळे कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी एफएसएसआयने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतरची परिस्थिती यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच स्वीट मार्ट व्यावसायिकांनाही मोठा फटका सहन करावा लागला आहे. तर भाडोत्री जागा घेऊन व्यवसाय करणाऱ्या अनेकांना मोठा फटका बसला आहे.

"अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणने घेतलेला निर्णय योग्य असून, सर्व स्वीट मार्ट चालकांनी ‘बेस्ट बिफोर’ असा उल्लेख केल्यास व्यवसायाबाबत विश्‍वासार्हता निर्माण होणार आहे. १ ऑक्‍टोबरपासून दुकानातील मिठाईबाबात या नियमाचे पालन केले जाते. नव्या नियमामुळे ग्राहकांनाही लाभ होणार आहे."

- जगन्नाथ चव्हाण-पाटील, संगीता स्वीट मार्ट, शहापूर

हेही वाचा - कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बेळगावातील नव्वद नवदुर्गा -

 

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new condition of FSSAI sweet dishes are checked out of best before in bakery in belgaum