
कोल्हापूर : जकात आणि एलबीटीनंतर महापालिकेच्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोतच बंद झाले असून शासन अनुदानावरच महापालिकेला अवलंबून रहावे आहे, अशा प्रसंगी महापालिकेने उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच प्रशासकीय खर्चातही कपात करणे गरजेचे आहे. तरच भविष्यात महापालिका तरणार आहेत.
कोल्हापूर महापालिकेल 2011 पर्यंत जकात हे महत्वाचे उत्पन्नाचे साधन होते.
जकातीच्या माध्यमतून 2011 ला 100 कोटी रुपयांचे उत्पन्न तर महापालिकेला मिळतच होते. पण महापालिकेच्या तिजोरीत खेळता पैसा राहत होता. परिणामी महापालिकेसमोर अर्थिक चणचण भासत नव्हती. 2011 ला जकात बंद झाली आणि एलबीटी नावाचा कर आला. या करालाही व्यापारी वर्गाने मोठा विरोध केला. परिणामी हा करही राज्यशासनाने बंद केला. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा एक प्रमुख मार्गच बंद झाला. यानंतर हळुहळू महापालिकेची अर्थिक स्थिती कमकुवत होत गेली. सद्यस्थितीत महापालिकेचा उत्पन्नाचा मार्ग म्हणून घरफाळा विभाग, नगररचना विभाग, इस्टेट,परवाना या प्रमुख विभागांचा समावेश आहे. महापालिकेचे बजेट हे 400 कोटीपर्यंत तयार केले जाते.पण प्रत्यक्षात आजही महापालिकेची कुवत ही 300 कोटीच्या आतच आहे. त्यातच आस्थापना आणि प्रशासकीय बाबींवरच मोठ्या प्रमाणात खर्च होतो. इंधन खर्च, विद्युत बिले, पाणी उपसा बिले यावरही मोठा खर्च झाल्यानंतर विकासकामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाटच असतो.
एलबीटी बंद केल्यानंतर महापालिकेला राज्यशासनाकडून दरमहिन्याला सात ते आठ कोटीचे अनुदान मिळते.या अनुदानामुळेच महापालिकेलाच पगार भागला जातो.आता अलिकडच्या काळामध्ये महापालिकेचे पगारही व्यवस्थती होत नाही.पगाराच्या तारखाही पुढे जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अर्थिक स्थिती सुधारणेबाबत उपाययोजना करायला हव्यात. अन्यथा महापालिका डबघाईला येण्यास फारसा वेळ लागणार नाही.
महापालिकेच्या खुल्या जागा,ओव्हरब्रिजखालची जागा या कचऱ्याने व्यापलेल्या आहेत. नागरिकांकडून येथे कचरा टाकला जातो.पण या जागा जर लोकसहभागातून अथवा खासगीकरणातून विकसित केल्या तर शहर सौदर्यात भर पडेल. तसेच स्पीड ब्रेकरवर सुध्दा पांढरे पट्टे मारावेत,स्पीड ब्रेकर आहेत, हे लोकांना कळायला हवे
- स्नेहल जाधव
आपले शहर, तुलनेने लहान असूनही विकास का होत नाही. महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. ज्या विभागातून उत्पन्न मिळते. त्या विभागाकडे लक्ष द्यायला हवे. केशवराव भोसले नाट्यगृहातून उत्पन्न मिळते. पण तेथे कुशल तंत्रज्ञ नाही. तंत्रज्ञ भरायला काय अडचण आहे. हे महापालिकेने सांगावे. लवकरात लवकर कुशल तंत्रज्ञाची भरती करावी- भरत गुरव,नागरीक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.