esakal | नृसिंहवाडीत या दत्त दर्शनाला पण अशी घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

nrusinhawadi temple open this time

दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्यापासून दत्तमंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग ठेवण्यात आला आहे.

नृसिंहवाडीत या दत्त दर्शनाला पण अशी घ्या काळजी

sakal_logo
By
जितेंद्र आणुजे

नृसिंहवाडी (कोल्हापुर) :  येथील दत्त मंदिर तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर दिपावलीच्या मुहूर्तावर  भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. भाविकांचे थर्मल टेंस्टीग व सॅनीटायझेशन करूनच दत्त दर्शन देण्यात येणार असून मंदिराची स्वच्छता व संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती  देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव पुजारी यांनी दिली.

 कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इतिहासामध्ये प्रथमच दत्तमंदीर तब्बल आठ महिने एक दिवस बंद राहिले. दत्त मंदिर जरी बंद असले तरी मर्यादित भाविकांना घेऊन श्रींची पूजा ब्रह्मवृंद   यांच्या सहकार्यांने  संपन्न होत होती. दत्त दर्शन न  मिळाल्यामुळे गेल्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये परिसरातील  अनेक भाविकांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत होता. भाविकांनी मंदिराकडे पाठ फिरविल्याने  येथील 54 हून अधिक मिठाई व्यापारी दुकानदारांची मिठाईची उलाढाल ठप्प झाली होती. कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी धार्मिक विधी संपन्न होत नव्हते. त्यामुळे एकूणच उत्साहाचं वातावरण फारसं नव्हते. कधी एकदा दत्तमंदिर उघडे होते? याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले होते.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याचा निर्णय दिपावली पाडव्याच्या मुहूर्ताला घेतला. या निर्णयाचा येथील देवस्थान ट्रस्ट, भाविकांसह अनेकांनी स्वागत केले आहे.
दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्यापासून दत्तमंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग ठेवण्यात आला आहे. मुख्य प्रवेशदारात भाविकांना देवस्थान कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांना थर्मल टेस्टिंग व सॅनीटायझेशन करून शासनाच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करीत दर्शन देण्यात येणार आहे.भाविकांना दर्शन घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांना मंदिर मार्गावर बॅरेकेटस उभे करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबा मंदिरे आजपासून खुली: असे मिळेल दर्शन

मुख्य मंदिरात पाच फूट अंतराने सोशल डिस्टंसिंग चा वापर करीत पांढऱ्या  रंगाने गोल रिंगण आखण्यात आले आहेत.
गेले आठ महिने जरी मंदिर बंद असले तरी, मंदिराची स्वच्छता अनेक  सेवेकरी यांच्या सहकार्याने लॉक डाऊन च्या काळामध्ये केली असून मंदिरघाट परिसरही संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.  भाविकांनी दर्शन घेताना सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करावा, तसेच शासकीय नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष श्री पुजारी यांनी केले आहे.
"
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर  नवीन वर्ष व पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होते असल्याने आम्हाला आनंद होत आहे. शासनाच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करून भाविकांना दत्त दर्शन देण्यात येणार आहे. दर्शन घेताना भाविकांनी कोणतीही गडबड करू नये. भाविकासाठी बंद असणाऱ्या महाप्रसादाची व्यवस्था खुली करण्यात येणार आहे. भाविकांच्या विसाव्यासाठी मंदिराच्या समोर व डाव्या बाजूला भव्य सभा मंडप उभे करण्यात आले आहे"

 अशोकराव पुजारी, अध्यक्ष, दत्त देवस्थान 

संपादन- अर्चना बनगे