बेळगाव जिल्ह्यात कोरोनाची 'हाफ सेंच्यूरी' पार....

The number of corona infected in Belgaum district has reached fifty one
The number of corona infected in Belgaum district has reached fifty one
Updated on

बेळगाव - हिरेबागेवाडी येथे आज (ता. 25) सहा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हाफ सेंच्यूरीवर पोचला आहे. काल (ता. 24) रायबाग कुडचीत दोन अल्पवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली होती. आज (ता. 25) दुपारपर्यंत आरोग्य खात्याच्या अहवालानुसार सहा जणांमध्ये कोरोणाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोणाग्रस्तांचा आकडा 51 वर पोचला आहे.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 51 वर पोचली असल्याने बेळगावसाठी ही धोक्‍याची घंटा ठरू लागली आहे. जिल्ह्यातील 521 जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रतिक्षेत होता. यापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. हिरेबागेवाडीतील 128 क्रमांकाच्या रुग्णाच्या द्वितीय संपर्कातील हे सर्वजण आहे. यात चार महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे. चार महिला या अनुक्रमे 39, 42, 55 व 80 वयोगटातील आहेत. तर पुरुष 38 व 45 वयोगटातील आहेत. सर्वजण हिरेबागेवाडीचे रहिवासी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri Elephant Return Kolhapur vantara team
Kolhapur Irrigation Department farmers news
Kolhapur football fans FIFA World Cup celebration
Kasba Beed gold coin discovery
Marathi News Esakal
www.esakal.com