गडहिंग्लजच्या महिलेचा पुण्यात कोरोनाने मृत्यु झाला पण तुम्ही घाबरु नका...

An old man from Gadhinglaj taluka but currently living in Pune died of corona
An old man from Gadhinglaj taluka but currently living in Pune died of corona
Updated on: 

गडहिंग्लज - मूळची तालुक्‍यातील हसूरचंपूची आणि सध्या पुण्यात वास्तव्याला असलेल्या एका वृद्धेचा काल कोरोनाने बळी घेतला. 74 वर्षीय असलेल्या या वृद्धेचे कुटूंब सहा-सात वर्षापासून पुणे येथेच राहत असल्याने आणि सदरची महिला गावी आलीच नसल्याने गडहिंग्लज तालुक्‍याला कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गडहिंग्लजपासून सात किलोमीटरवर हसूरचंपू गाव आहे. या गावातील एक कुटूंब सात वर्षापासून पुणे येथेच वास्तव्याला आहे. गावात त्यांचे जवळचे नातेवाईकही नाहीत. यामुळे हसूरचंपू ते पुणे कनेक्‍शनचा प्रश्‍नच येत नाही. सदरची महिला वर्षभरापूर्वी गावाकडे येवून गेल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्यांचे कोणीही गावाकडे आणि गावातून त्यांच्याकडे गेलेले नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या कुटूंबातील 74 वर्षीच वृद्धेला कोरोनाची लागण झाली होती. तिचा आज औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समजताच तालुक्‍यात उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. हसूरचंपू गावात याची माहिती देण्यात आली. प्रशासनाला माहिती कळताच तहसीलदार दिनेश पारगे यांनी गावकामगार तलाठी यांच्या माध्यमातून या कुटूंबाची अधिक चौकशी केली. हे कुटूंब सध्या गावाकडे आलेले नाही. शिवाय त्यांचे जवळचे असे कोणीच हसूरचंपूत राहत नाहीत. यामुळे नातेवाईकांशी संपर्क येण्याचाही प्रश्‍न येत नाही. म्हणून गडहिंग्लज तालुक्‍याला या घटनेचा कोणताही धोका नसून लोकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन तहसीलदार श्री. पारगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com