सांगली- वाटेगावातील एकाला कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

तालुका प्रशासनाने आज रात्री तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

इस्लामपूर : मुंबई-परेल येथून वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे आलेल्या एका 34 वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल आज रात्री पॉझिटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली. हा युवक 22 मे ला मुंबईवरून गावी आला होता. त्याला तापाची लक्षणे जाणवू लागताच मंगळवारी (ता. 26) मिरज येथे हलविण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

हे पण वाचा - एका फोनवरील मन हेलावणारी करूण कहाणी 

तालुका प्रशासनाने आज रात्री तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात पॉझिटिव्ह आलेला हा पाचवा रुग्ण आहे. त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा - पाच हजार कुटुंबे पुन्हा भितीच्या छायेखाली 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more corona positive patient found in sangli