आश्चर्यम् ! 'कोरोना'वर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा... 

डी. एन. बन्ने
गुरुवार, 9 एप्रिल 2020

भिवशीत अभिनव उपक्रम : जनजागृती करण्याचा उद्देश

सौंदलगा (बेळगाव) - कोरोनाला  टक्कर देण्यासाठी विविध उपायोजना राबविण्यात येत आहेत. या विषाणूपासून बचावासाठी ऑनलाइन हा चांगला पर्याय आहे. त्याचाच उपयोग करून जनजागृती करण्याच्या उद्देशाने निपाणी तालुक्यातील भिवशी येथे एस. ग्रुपतर्फे 'कोरोनापासून देशाला कसे वाचवता येईल...' या विषयावर ऑनलाईन (व्हाट्सॲप) मराठी भाषेतून देशातील सर्व राज्यातील सर्व वयोगटांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या अभिनव उपक्रमाचे कौतूक होत आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले भाषण घरी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे आहे. हे रेकॉर्डिंग कोणत्याही  एडिट विना, न थांबता केलेले, सात ते आठ मिनिटाचे असावे. स्पर्धेतील प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 701, 601, 501 रुपयांचे बक्षीस व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रमाणपत्र कुरियरने तर बक्षिसाची रक्कम बँक अकाउंटवर जमा केली जाणार आहे. भाषण पाठवण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल असून 14 एप्रिल रोजी स्पर्धेचा निकाल आहे. स्पर्धकांनी संजय मगदूम (9036491588), लक्ष्मीकांत पाटील (9611761010), विशाल पाटील (7773961922), दिग्विजय वारके (8530096810) यांच्याकडे भाषण पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे 

असाही जनजागृतीपर संदेश

या वक्तृत्व स्पर्धेसाठी ऑनलाइन पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यातून 'घरी रहा, सुरक्षित रहा', 'आपले शहर, कुटुंबीय आणि स्वतःला कोरोनापासून वाचवा' असा जनजागृतीपर संदेशदेखील देण्यात आला आहे.

या वक्तृत्व स्पर्धेसाठी ऑनलाइन पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यातून 'घरी रहा, सुरक्षित रहा', 'आपले शहर, कुटुंबीय आणि स्वतःला कोरोनापासून वाचवा' असा जनजागृतीपर संदेशदेखील देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online speech computation in soundalga belgum