इस्लापुरच्या ओसवाल बंधुंनच असे हे दातृत्व... 

oswal brothers help to people in islampur
oswal brothers help to people in islampur

इस्लामपूर - येथील नगरसेवक अमित ओसवाल आणि माजी नगरसेवक कपील ओसवाल यांनी कोरोनाच्या संकटातही आपले दातृत्व जपले आहे. वाळवा तालुक्यावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी पुर्ण ताकदीने धाऊन जाणारे हे ओसवाल बंधू कोरोनाच्या संकटात सुध्दा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. 

मागील पंचवार्षिक निवडणूकीत कपील ओसवाल तर सध्या अमीत ओसवाल शहरातील एका प्रभागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. इस्लामपूर शहर आणि तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यात ओसवाल परिवार नेहमीच सहभागी असतो. त्याशिवाय प्रत्येक संकटात देखील त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. मागील वर्षी आलेल्या महापुरावेळी बाधीत घरातील नागरिकांना घरातून सुखरुप बाहेर काढून इस्लामपूरात आणणे आणि त्यांची तब्बल महिनाभर राहण्याची, जेवणाची व्यवस्था करणे अशी कामे अमीत ओसवाल यांनी केली. त्यासाठी त्यांनी येथील खुल्या नाट्यगृहाच्या आवारात छावणी उभारली होती.

सध्या कोरोनाचे संकट आहे. बाजारपेठा ठप्प आहेत. अशात हातावरचे पोट असणार्‍यांचे मात्र हाल सुरु आहेत. रोजच्या रोज कमवून खाणार्‍यांना लॉकडाऊन कधी संपतोय याची चिंता लागून राहिली आहे. छोटे छोटे विक्रेते, मजुर, हातगाडीवाले असे अनेकजण यात भरडले जात आहेत. शहर व परिसरातील अशा घटकांची उमासमार होऊ नये म्हणून नगरसेवक अमीत ओसवाल पुढे आले आहेत. स्वखर्चातून संबंधीत कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे कीट तयार करुन त्यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. सुमारे दोन हजार किट त्यांच्याकडून वितरीत होणार आहेत. 

या शिवाय दररोज सुमारे 400 लिटर दूध ठिकठिकाणी स्टॉल लाऊन ना नफा ना तोटा अशा स्वरुपात त्यांची टीम विक्री करीत आहे. बोरगावातील शेतकर्‍यांनी देखील त्यांना मोठ्या प्रमाणात भाजीपाला दिला. त्याचेही योग्य नियोजन करुन गरजुंना त्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा शहरातील वाढता प्रसार लक्षात घेता नागरिक भयभीत आहेत. रस्त्यांवर स्मशान शांतता आहे. अशात त्यांची टीम व ते स्वतः धोका पत्करुन झोकून देऊन काम करीत आहेत. शहरात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने बाधीत परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले. या कामातही कपील व अमीत ओसवाल अग्रभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com