बस मध्ये का चढलात ? कोणाची परवानगी घेतलीत ? म्हणत प्रवाशाने घातली हूज्जत...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

शिरोली नाक्यावर आलेल्या एका खाजगी लक्झरी बस मधून तपासणी करून उतरताना एका युवक प्रवासाने बस मध्ये का चढलात ? कोणाची परवानगी घेतलीत ? तुम्ही नियमाचे उल्लंघन करताय. म्हणून डॉक्टरशी उद्धट वर्तन केले.

कोल्हापूर - जिल्हा प्रशासन आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहरातील सर्व नाक्यावर येणाऱ्या लक्झरी बसेस आणि परराज्यातील वाहनाने चालक आणि प्रवाशांची तपासणी करण्याचे तसेच त्यांना मार्गदर्शक सूचना करण्याचे काम प्रशासनाने नेमलेल्या डॉक्टरांच्या पथकाद्वारे होत आहे. शिरोली नाक्यावर आलेल्या एका खाजगी लक्झरी बस मधून तपासणी करून उतरताना एका युवक प्रवासाने बस मध्ये का चढलात ? कोणाची परवानगी घेतलीत ? तुम्ही नियमाचे उल्लंघन करताय. म्हणून डॉक्टरशी उद्धट वर्तन केले आणि परवानगी पत्राची मागणी केली. यावेळी उपस्थित काही नागरिक आणि वृत्तपत्र प्रतिनिधी यांनी या युवकाची कानउघडणी केली.

 हे राष्ट्रीय संकट आहे. ही तपासणी जनतेच्या हितासाठी आहे. याठिकाणी परवानगीची गरज लागत नाही असे सांगितल्यानंतर त्यानंतर स्वतःला आपण एका विमान वाहतूक कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगणारा युवक मान खाली घालून गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passenger behaves rude to a doctor while checking off a private luxury bus on Shiroli naka