कोल्हापूरवासियांचे थेट पाईपलाईनचे स्वप्न आले टप्यात, पाणी योजनेचे 78 टक्के काम पूर्ण

The people of Kolhapur dreamed of a direct pipeline
The people of Kolhapur dreamed of a direct pipeline
Updated on


कोल्हापुरकरांनी अनेक वर्षापासून बाळगलेले थेट पाईपलाईनचे स्वप्न या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्‍यता दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी दिवाळीची अंघोळ काळम्मावाडी धरणातील पाण्यानेच होईल, यावर पालकमंत्री तसेच ग्रामविकासमंत्री ठाम आहेत. कामाची व्याप्ती पाहता दिवाळीची अंघोळ (अभ्यंगस्नान) खरचं थेट पाईपलाईनच्या पाण्याने होईल का? याबाबत शंका आहे. योजनेचे 78 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. धरणातील पाणी पातळी कमी करण्याचे मोठे आव्हान अजूनही आहे. उर्वरीत कामासाठी जेमतेम साडेतीन महिने मिळतील. पंधरा मे नंतर पावसाळ्याची चाहूल लागेल. काळम्मावाडी धरणालगतचा पट्टा पावसाळी प्रदेशात मोडतो. मे महिन्यानंतर येथे कामास मर्यादा येतात. पावसाळा संपण्यास किमान ऑक्‍टोबर उजाडतो. त्यामुळे वर्षाअखेरीस काम पूर्ण होऊन नळाला थेट पाईपलाईनचे पाणी येईल याबाबत शंका आहे. 
 


488 कोटींच्या योजनेचे सुमारे 52 किलोमीटर अंतराची पाईपलाईन आहे. सोळांकूर येथे 1900 मीटर पाईपलाईनचे काम बाकी आहे. या कामास आता सुरवात झाली तर ते मे पर्यंत संपेल. सोळांकूर ग्रामस्थ अजूनही पाईपलाईनला परवानगी देण्याच्या मनस्थितीत नाहीत. 
पालकमंत्री सतेज पाटील यांनी 2014 च्या निवडणुकीत थेट पाईपलाईनने पाणी आणल्याशिवाय आपण पुढील निवडणूक लढविणार नाही, असा प्रतिज्ञा केली होती. नेमका 2014 च्या निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला. परवान्यांच्या फेऱ्यात योजना अडकली. जॅकवेलसाठीची झालेली खोदाई पाहून डोळे पांढरे होतील इतकी कामाची व्याप्ती मोठी आहे. सध्या इंटकवेलचे काम सुरू आहे. दिवाळीची अंघोळ पाईपलाईनच्या पाण्याने घालतो, असे म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्ष हे ही दिवास्वप्न ठरेल अशीच सद्यस्थिती आहे. 

सद्यस्थिती 
एकूण जमा निधी-425 कोटी 
एकूण खर्च- 363 कोटी 
शिल्लक निधी- 62 कोटी 
लोकसंख्या- 2011- 5 लाख 49,283 
2030-8 लाख 05991 
2045-10 लाख 29,967 
दरडोई होणारा पाणीपुरवठा - 135 लिटर्स प्रतिदिनी 
पाण्याची एकूण मागणी- वर्ष 2030- 180 दशलक्ष लीटर्स 
2045 -238 दशलक्ष लीटर्स 
समाविष्ट कामे- धरण क्षेत्रात हेडवर्क्‍स बांधणे 
आर. सी. सी.इनटेक वेल- व्यास 4.50 मीटर उंची 10 मी. 
आर. सी. सी. इंटकवेल क्रमांक एक-व्यास चार मीटर, उंची 10 मी. 
इंटकवेल क्रमांक दोन- व्यास चार मी. उंची 10 मी. 
आर. सी. सी. कनेविंटग पाईप-व्यास अठराशे मी. मी. एन. पी.4 लांबी 150 मीटर 
व्यास 1400 मी. मी. एन. पी. 4 लांबी, 160 मीटर 
आर. सी. सी. जॅकवेल व पंप हाऊस 
18 मीटर व्यासाची दोन जुळी जॅकवेल- एकूण उंची 46 मीटर 
पंप हाऊस-36.50 मीटर, 21.50 मीटर आयताकृती उंची 11 मीटर 
पंपीग मशनिरी 940 अश्‍वशक्तीचे चार पंप,68 मीटर पाणी फेकण्याची क्षमता 
26,10400 लीटर्स, प्रती तास कार्यन्वित पंप 3, स्टॅन्ड बाय-एक पंप 
------------------------------------------------ 
मुख्य पाईपलाईन-52.47 कि. मी. 
जलशुद्धीकरण केंद्र- क्षमता 80 एमएलडी 
मुख्य संतुलन टाकी-34,00,000 लीटर्स 
आऊटलेट आर. एल. 627.50 मीटर 
उंची- 3.50 मीटर 
---- 

मुख्यवाहिनी ः पुईखडी ते फुलेवाडी, बावडा जलशुद्धीकरण केंद्र 600 मी. मी. 
पुईखडी ते शेंडापार्क- 800 मी. मी. व्यास 
चंबुखडी साठवण टाकीसाठी 100 मी. मी. व्यास 
------------------ 
प्रश्‍न 
पाण्याची पातळी कमी करण्याचे आव्हान 
सध्याची पातळी 641 मीटर 
खाली करावी लागणारी पाण्याची पातळी 639 मी. 
सोळांकूर येथे पाईपलाईनचे काम प्रलंबित 
योजनेच्या कामास सातत्याने मुदतवाढ 
कामाची गती वाढविण्याची गरज 
धरणातील पाणी कमी करण्याचे मोठे आव्हान 
वन्यजीवांचा धोका अधिक 
वन्यजीव कायद्यामुळे सायंकाळी सातनंतर काम बंद 
------------------------- 
उपाय 
कामावर प्रभावी नियंत्रण हवे 
पाण्याची पातळी कमी करण्यासाठी डी वॉटरिंग 
सोळांकूरचा प्रश्‍न सामंजस्याने सोडविणे 
आयुक्तांनी सातत्याने आढावा घेणे 
साईट व्हिजीटची संख्या वाढविणे 
पावसाळ्यापुर्वी पाण्याची पातळी कमी करणे 
शहरातंर्गत जुन्या पाईपलाईन बदलणे 
------------------------------- 
कोट 
इन्स्पेक्‍शन वेल, ब्रेक प्रेशर टॅंक, जॅकवेलचे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे. डी वॉटरिंगद्वारे पाण्याची पातळी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. साठ मीटरपर्यंत कॉंकीट पूर्ण करण्यासाठी सिमेंटचा प्लान्ट कामाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिमेंटची गाडी आली नाही म्हणून काम थांबले, असे होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे. सोळांकूरमधून पाईपलाईन टाकण्याचा प्रश्‍न लवकर निकाली निघाला तर कामाला आणखी गती येईल. 
हर्षजित घाटगे, प्रकल्प अभियंता 

थेट पाईपलाईनच्या माध्यमातून स्वच्छ तसेच मुबलक पाणी शहरवासियांना मिळणार आहे. गुरुत्वाकर्षणाने (ग्रॅव्हीटी)ने पाणी येणाऱ्या असल्याने विजेच्या खर्चात पन्नास टक्के बचत होणार आहे. अनेक वर्षापासून ज्यासाठी संघर्ष केला ते काम सत्यात उतरत असल्याचा अभिमान आहे. निम्मे आजार हे पाण्यामुळे होतात. त्यामुळे आरोग्यावरील खर्चातही बचत होईल. मी स्वतःहून धरणाच्या बाजूने पंधरा किलोमीटरचा प्रवास केला आहे. पाणी स्फटीकाप्रमाणे आहे. 1993 मध्ये मी यासंबंधी पुस्तक लिहले होते. त्यात ज्या गोष्टी नमूद त्याचा अंतर्भाव कामात झाला आहे. पाणी मुबलक आहे म्हणून ते कसेही वापरून चालणार नाही. पाणी काटकसरीने वापरण्याची जबाबदारी नागरीकांची आहे. 
दिलीप पवार, तज्ज्ञ 

ज्यांच्या त्यागामुळे शहराला स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्या प्रकल्पाग्रस्तांचे प्रश्‍न कायम आहेत. वाडीवस्तीवरील लोकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यांच्या पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणे महत्वाचे आहे. थेट पाईपलाईनने शहरासाठी पाणी आल्यानंतर ते जपून वापरण्याची जबाबदारी आपली असेल. पाणी मुबलक आहे, त्याचा गैरवापर करणे योग्य होणार नाही. 
मोहन सरवळकर, नागरिक 

संपादन - यशवंत केसरकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com