'या' वयातील लोकांना कोरोनाचा जास्त धोका 

महेश काशीद 
Friday, 14 August 2020

ऑक्‍सीमीटर आणि थर्मल स्कॅनर माध्यमांनी तपासणी केली जाणार आहे.

बेळगाव - जिल्ह्यात कोरोनामुळे 113 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पंन्नाशी ओलांडलेल्या 77 जणांचा समावेश आहे. 40 ते 50 वयोगटातील 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बालक आणि गर्भवतीपेक्षा वृध्दांना अधिक धोका असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडा 6, 640 वर पोहचला. त्यापैकी 2,928 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 3,599 जण उपचार घेत आहेत. पण एकूण 113 जणांचा मृत्यू झाला आहे. रोज 3 ते 4 जणांचा मृत्यू होत आहे. यात सर्वाधिक 50 हून अधिक वयाच्या 77 जणांचा समावेश आहे. 45 ते 50 वयोवयोगटातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सुरवातीपासून वृध्दांची काळजी घेण्याबाबत सूचना केली होती. घराबाहेर न पडण्याबाबत आवाहन केले होते. पंरतु, दक्षता न घेणे, सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार मिळताना मर्यादा आल्याने वृद्धांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी हिरेबागेवाडीत झाला. एप्रिलमध्ये 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान रुग्णांचा आकडा वाढला. पण, कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. पण, 1 ते 30 जुलै दरम्यान मृत्यूची संख्या वाढली. या दरम्यान 69 जणांचा मृत्यू झाला. तर 13 ऑगस्टपर्यंत 113 जमांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पंन्नाशी ओलांडलेल्या 77 जणांचा समावेश आहे. 

हे पण वाचाVideo - ब्रेकिंग - महिलांनी फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना काळं फासून काढली धिंड

 

55 पेक्षा अधिक वय असलेल्यांची चाचणी 

पंन्नाशी ओलांडलेल्यांना कोरोनाचा धोका वाढल्यामुळे 55 हून अधिक वय झालेल्यांची कोरोना चाचणी सक्तीची केली जात आहे. यामुळे प्राथमिक पातळीवर रोगाचे निदान होईल आणि उपचार मिळणे सुलभ होईल, या उद्देशाने हा निर्णय घेण्याची तयारी सुरु आहे. ऑक्‍सीमीटर आणि थर्मल स्कॅनर माध्यमांनी तपासणी केली जाणार आहे. पंरतु, 55 हून कमी वय असलेल्या व्यक्तीची लक्षणे जाणविल्यास चाचणी केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तेथे सूचना करण्यात आल्या आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People over the age of 50 have a higher risk of corona