esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

peoples have been quarantined in rural area from mumbai due to corona

कोरोनामुळे मुंबईकर गावात क्वारंटाइन : गावकऱ्यांनी घेतली खबरदारी

बंबई से आया मेरा दोस्त... दूर से सलाम करो !

sakal_logo
By
राजेंद्र हजारे

निपाणी - 'बंबई से आया मेरा दोस्त..दोस्त को सलाम करो...', या 'आप की खातिर' चित्रपटासाठी बप्पी लहिरी यांनी गायलेले हे गीत प्रचंड गाजले होते. आजही मुंबईकर मित्रांची क्रेझ कायम आहे. मात्र सध्या कोरोनामुळे अनेक मुंबईकर गावाकडे क्वारंटाइन झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता 'बंबई से आया मेरा दोस्त... लेकीन दोस्त को दूर से सलाम करो!' असे म्हणावे लागत आहे.

मुंबईचा दोस्त म्हणजे जीव की प्राण

मुंबई, पुण्यासह इतर भागातील नोकरदार, व्यावसायिक, चाकररमान्याना सध्या कोरोनाच्या दक्षतेबाबत गावाकडे सशर्त अटीवर पाठवण्यात आले आहे. गावच्या यात्रा, जत्रा, गणेशोत्सव, दिवाळीत मुंबईकरांची आवर्जून उपस्थिती असते. शिवाय विविध निवडणुकांतही अनेक मुंबईकर मंडळीवरच भिस्त ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे पुणे, मुंबईकर प्रत्येक गावचा वेगळा चेहरा बनलेले आहेत. आता कोरोनामुळे गावाकडे आल्यानंतर होम क्वारंटाइन अथवा संस्थात्मक क्वारंटाइन करण्याची प्रमुख अट आहे.
निपाणी तालुक्यातही अनेक लहान-मोठ्या गावात ही मंडळी दाखल झाली आहेत.

वाचा - अन् त्याने अंगावरील कपडे काढून थेट कूपनलिकेतच घेतली उडी...

मुंबईचा दोस्त म्हणजे ग्रामीण भागातील मित्रांचा जीव की प्राण असतो. किंबहुना ग्रामीण भागात त्यांना जिगरी दोस्त म्हटले जाते. मात्र सध्या कोरोनामुळे केवळ आपल्या कुटुंबीयांसमवेतच रहावे लागत आहे. त्यांना नेण्यासाठी कोणी मित्रमंडळीही दिसून येत नाहीत. मात्र आल्यानंतर त्यांना लांबूनच नमस्कार करण्यापलीकडे हे मित्र त्यांना भेटण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत.
 

'कोरोनामुळे अनेक पुणे, मुंबईकर आपापल्या शहरासह गावाकडे परतले आहेत. आपले मित्रही सध्या शहरात पोहोचले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराने दुरावले आहेत. ते स्वतःहून होम क्वारंनटाइन असल्याने लवकरच कोरोनाचा लढा आपण जिंकू असा विश्वास आहे.'
- प्रथमेश भोंगाळे, निपाणी

go to top