मुंबईहून बेळगावात आलेल्या 'त्या' गर्भवती महिलेला कोरोना...

Corona to a pregnant woman who came to Belgaum from Mumbai
Corona to a pregnant woman who came to Belgaum from Mumbai
Updated on: 

बेळगाव - शहरात सदाशिवनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह महिला आज (ता.14) आढळली. या भागातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते बंद केली आहेत. आझाद गल्ली, कॅम्प, आझमनगर, आस्मा कॉलनीत याआधी कोरोनाबाधित आढळले आहेत. पहिल्यांदा सदाशिवनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला आहे. यामुळे शहरामध्ये नवीन हॉट स्पॉट तयार झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात नव्या रुग्णाची भर पडल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 108 झाली आहे.आरोग्य विभागातर्फे कोरोनाबाधितांची आकडेवारी आज (ता.14) जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शहरात सदाशिवनगरला कोरोनाबाधित महिला आढळली आहे. महिलेचे वय 27 आहे. शिवाय त्या गदोदर असल्याची प्राथमिक माहिती आहे. बाधित महिला सहकुटूंब मुंबईत राहत होती. मध्यंतरी लॉकडाऊन शिथिल झाले.

आंतरराज्य सीमा पार करण्यासाठी पास देण्यात आले. यादरम्यान महिला सहकुटूंब मुंबई येथून बेळगावला आली. सदाशिवनगरमधील भास्कर डेअरीजवळ राहत. या दरम्यान त्यांच्या घशातील स्वॅब घेण्यात आले. वैद्यकीय तपासणी अहवाल आज उपलब्ध झाला. त्यामध्ये महिलेला कोरोना झाल्याचे निदान झाले. बाधित महिलेला कोराना कक्षात आणि कुटूंबाला क्वारंटाईन केले आहे. ज्या गाडीने मुंबई ते बेळगाव प्रवास महिलेने केला. त्या वाहनाचा चालक मुंबई धारावीतील होता, अशी माहिती आहे.
जिल्ह्यात 24 तासात एका रुग्णाची भर पडली. त्यामुळे बाधितांची संख्या 108 झाली आहे. बेळगाव तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. शहरात आझाद गल्ली, कॅम्प, आझमनगर व आस्मा कॉलनीत रुग्ण आढळून तीन आठवडे झाले. पण, आज नवीन सदाशिवनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली. तसेच जिल्ह्यामध्ये गेल्या सोमवारपासून नवीन संसर्ग नव्हता. आज परत मुंबईहून आलेल्या महिलेला लागण झाल्याने रुग्ण संख्या एकने वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dhananjay Mahadik statement on Rahul Gandhi voter revision
Gokul Election 2026 Satej Patil statement on Mahayuti
Pethwadgaon Hatkanangale road accident HDFC bank manager death
leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com