कोरोनाबाबत गरोदर महिलांनी अशी घ्यावी खबरदारी

प्रतिनिधी
रविवार, 24 मे 2020

डॉ. जाधव यांनी सांगितले की, गरोदर महिलेंमध्ये कोरोना विषयी त्यांच्या मनात भिती आहे. कोरोनामुळे आपल्या होणाऱ्या बाळावर काही विपरित परिणाम होणार नाही ना ? अशी शंका अनेकांना आहे. त्यातून कांहीच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे करोना विषयी मनातील शंका दुर करून या महिलांचे मनोबल वाढविणारे समुपदेशन केले जाते.त्याचाच भाग म्हणून गरोदर महिलांनी खबरदारी म्हणून स्वच्छता राखावी त्यासाठी वारंवार हातधुण्याबरोबर वयैक्तीक अंतर राखणे आवश्‍यक आहे. 

डॉ. जाधव यांनी दिलेल्या टिप्स अशा 

कोल्हापूर ः कोरोना संर्सग होऊ नये, यासाठी गर्भवती महिलांनी सामाजिक अंतर योग्य तऱ्हेने राखल्यास होणाऱ्या बाळास संसर्गाचा धोका नाही. देशभरात कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलांची प्रसुती झाली. त्यांच्या बाळाला कोरोना झालेला नसल्याची उदहरणे आहेत. त्यामुळे गरोदर महिलांनी खबरदारी घेणे हाच सर्वात महत्वाचा उपचार आहे, असे निरिक्षण स्त्रीरोग तज्ज्ञ इंद्रनिल जाधव यांनी नोंदविले आहे. 
गरोदर महिलांना कोरोना विषयी भिती वाटत आहे. मानसिक दृष्ट्या त्या तणावात आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्त्री रोग तज्ञांकडून गरोदर महिलांना ऑनलाईन समुपदेशन केले जात आहेत. 
डॉ. जाधव यांनी सांगितले की, गरोदर महिलेंमध्ये कोरोना विषयी त्यांच्या मनात भिती आहे. कोरोनामुळे आपल्या होणाऱ्या बाळावर काही विपरित परिणाम होणार नाही ना ? अशी शंका अनेकांना आहे. त्यातून कांहीच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे करोना विषयी मनातील शंका दुर करून या महिलांचे मनोबल वाढविणारे समुपदेशन केले जाते.त्याचाच भाग म्हणून गरोदर महिलांनी खबरदारी म्हणून स्वच्छता राखावी त्यासाठी वारंवार हातधुण्याबरोबर वयैक्तीक अंतर राखणे आवश्‍यक आहे. 

डॉ. जाधव यांनी दिलेल्या टिप्स अशा 
गरोदरपणात मनात दाटणारी भिती दुर करण्यासाठी मन खंबीर राखावे. त्यासाठी ध्यान करावे तसेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार क्षमतेनुसार योग करावा. या काळात आहार संतुलीत घ्यावा. अती थंड किंवा अतिउष्ण पदार्थांचे सेवन शक्‍यतो टाळलेले बरे. 24 तासात किमान 7 तास पुरेशी झोप घेणे आवश्‍यक आहे. सकाळच्या कोहळ्या उन्हात एक तासभर थांबणे किंवा हलकेच चालणे आवश्‍यक आहे. तर दिवसभरात फावल्या वेळी मनाला प्रसन्नता येईल अशा विषयांचे वाचन किंवा मनोरंजन करून घेणे महत्वाचे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant women should be careful about corona