गडहिंग्लजला लाल मिरची तेजीत 

दीपक कुपन्नावर
Monday, 4 January 2021

गडहिंग्लज येथील आठवडा बाजारात लाल मिरचीची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत.

गडहिंग्लज : येथील आठवडा बाजारात लाल मिरचीची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. भाजी मंडईत कोबी, पालेभाज्या, कोथिंबीर, टोमॅटोची आवक अधिक असुन दर कमी आहेत. कादा, बटाट्याचे भाव वधारले आहेत. फळबाजारात संत्र्यांचा आवक अधिक असल्याने दर कमी आहे. जनावरांच्या बाजारात म्हैशी, शेळ्या मेंढ्यांची आवक टिकून आहे. 

ग्रामीण भागासह लगतच्या सीमाभागातील शेतकरी मिरची विक्रीसाठी येथील बाजार समितीत आणत आहेत. यंदा झालेल्या विक्रमी परतीच्या पाऊसामुळे मिरचीचे उत्पादन सरासरी पन्नास टक्के कमी आहे. त्यामुळेच जवारी मिरचीला उचांकी भाव मिळत आहे. जवारी मिरची दर्जानुसार 400 ते 1000 रूपये किलो आहे. ब्याडगी मिरची अडीचशे ते चारशे रुपये किलो आहे. 

पालेभाज्या 3 ते 4 रुपये तर, कोथिंबीर 3 ते 5 रूपये पेंढी असा भाव आहे. तुलनेत कोबी आणि टोमॅटोची सर्वाधिक आवक आहे. म्हैशीची आज 150 पेक्षा अधिक आवक झाल्याचे बाजार समितीतुन सांगण्यात आले. 25 ते 90 हजारापर्यंत दर होते. बकरी आणि मेंढ्यांना मागणी वाढली आहे. शेळ्या मेंढ्याची सुमारे 175 पेक्षा अधिक आवक होती. 5 ते 15 हजार दर होते. बैलजोड्यांची आवक तुरळक आहे. 

कांदा, लसुणाची आवक मंदावल्याने भाव वाढल्याचे विक्रेते अमरने नेवडे यांनी सांगितले. कांदा 2000 ते 3500 रूपये क्विंटल तर, किरकोळ बाजारात 25 ते 40 रुपये किलो अशी विक्री सुरू आहे. लसूण 6000 ते 10000 रूपये क्विंटल तर, किरकोळ बाजारात 70 ते 120 रुपये किलो असा दर आहे. संत्रीची आवक वाढल्याने दर कमी असून 30 ते 40 रुपये किलो असा भाव आहे. संफरचद 100 ते 120 रुपये किलो आहेत. 

सोयाबीनला सर्वाधिक दर 
सोयाबीनचा गेल्या दीड महिन्यापासून दर वधारत आहे. या आठवड्यात सोयाबीनचा क्विंटलला 4400 रुपये असा दर झाला आहे. हा दर या हंगामातील सवाधिक असल्याचे व्यापारी मल्लिकार्जुन बेल्लद यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी गर्दी आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Price Of Red Pepper Increased In Gadhinglaj Kolhapur Marathi News