
गडहिंग्लज (कोल्हापूर) : आजरा व चंदगड तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण आढळले. यानिमित्ताने कोरोना गडहिंग्लजचे दार ठोठावत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक बनले आहे. प्रशासनाकडूनही तसे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमधील खासगी डॉक्टरसुद्धा आता "अलर्ट' झाले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आता आजारी रूग्णासोबत संबंधित गावचे सरपंच व पोलिस पाटलांचे पत्र घेवून येण्याचे आवाहन त्यांनी नातेवाईकांना केले आहे.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यासह कर्नाटकच्या सीमाभागातील मेडीकल हब म्हणून गडहिंग्लज शहर पुढे आले आहे. सर्व प्रकारच्या गंभीर आजारी रूग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय केंद्र म्हणून गडहिंग्लज नावारूपाला आले आहे. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या प्रशासनालाही खासगी व्यावसायिकांनी आपापल्या परीने सहकार्य करीत आहेत. क्वारंटाईनसाठीही बेड उपलब्ध करून दिले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या व्यावसायिकांकडून खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, आजरा व चंदगडमध्ये तीन कोरोना रूग्ण आढळले. या सर्वांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री मुंबई आहे. शासनाने आता पुणे, मुंबईसह विविध जिल्हे आणि परराज्यात असणाऱ्यांना आपापल्या घराकडे जाण्याची परवानगी दिली आहे. आजपासून ही आवक सुरू होणार आहे. गडहिंग्लजशी संलग्न असणाऱ्या तालुक्यांमध्ये हजारो ग्रामस्थ गावाकडे येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही पंधरा हजारहून अधिक ग्रामस्थ गावाकडे परतलेत. परंतु त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे. मात्र, सध्या येणाऱ्यांपासून खबरदारी घ्यावी लागणार आहे. संबंधित गावेही आता बाहेरून येणाऱ्या नागरिकांपासून खबरदारी घेत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील सर्वच दवाखान्यांच्या डॉक्टरांनी अलर्ट राहण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरून येणाऱ्यांतील काही इतर आजाराचे रूग्ण तपासणीसाठी शहरातील हॉस्पीटलकडे धाव घेत आहेत. त्यांना दवाखान्यांमध्ये सेवा दिली जात आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्यांपासून खबरदारी घेण्याची गरज असल्याने येथील मेडिकल असोसिएशनने रूग्णासोबत गावचे सरपंच किंवा पोलिस पाटील यांचे संबंधित व्यक्ती गावी आलेल्याची तारीख नमूद करून पत्र घेवून येण्याचे आवाहन गडहिंग्लजच्या आयएमए संघटनेने केले आहे.
` शासन परवानगीने राज्य व परराज्यात अडकलेले हजारो लोक गावाकडे परतत आहेत. यातील काही इतर आजाराचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यात येत आहेत. सर्व हॉस्पीटलमध्ये रूग्ण सेवा सुरळीत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रूग्णासोबत सरपंच, पोलिस पाटील यांचे पत्र आणण्याचे आवाहन केले आहे.''
- डॉ. उत्तमचंद्र इंगवले, आय.एम.ए , अध्यक्ष गडहिंग्लज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.