एक कोटीहून अधिकच्या वसुलीचा तगादा ; राजारामपुरीतील खासगी सावकारावर गुन्हा...

Private lender in Rajarampuri charged in police station
Private lender in Rajarampuri charged in police station

कोल्हापूर - एक कोटीहून अधिक रक्कमेचा वसुलीसाठी कॉन्ट्रक्‍टरला गुंडाकडून मारहण करत कुटुंबासह त्यांच्या दिवाणजीला त्रास देणाऱ्या खासगी सावकाराविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुभाष रामचंद्र दुर्गे (रा. प्लॉट नंबर 49, संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, राजारामपुरी) असे त्या संशयित खासगी सावकारांचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अवैध धंदे पाठोपाठ पोलिसांनी खासगी सावकारी मोडून काढण्याची मोहीम हाती घेतली. त्याचा चांगलेच यश मिळत आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात अशाच पद्धतीचा खासगी सावकारा विरोधातील गुन्हा दाखल झाला. कृष्णा नाना लाड (वय 57) हे पांचाली अपार्टमेंट, अंबाई टॅंक, रंकाळा येथे राहतात. ते बांधकाम कॉन्ट्रक्‍टर आहेत. त्यांना 2012 मध्ये पैशाची गरज होती. त्यांनी संशयित खासगी सावकार सुभाष दुर्गे याच्याकडून दरमहा तीन टक्के व्याजदराने वेळोवेळी 50 लाख रूपये घेतले. त्या पैशाची लाड यांनी टप्प्याटप्याने त्यांच्या व मुलाच्या नावाने धनादेशाद्वारे व रोखीने व्याजासह 1 कोटी 47 लाख रुपये इतके परत केले होते.

तरीही दुर्गेचा त्यांच्याकडे 1 कोटी 3 लाखांच्या वसुलीचा तगादा लावलोता. त्या पैशाच्या वसुलीसाठी सन 2014 ते काल अखेर तो लाड यांच्या राहत्या घरात जाऊन त्यांच्या कुटुंबासमोर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करून त्रास देत होता. तसाच त्रास तो लाड यांचे दिवाणजी चाचे यांना फोनवरून दिला जात होता. तसेच पैशाच्या वसुलीसाठी त्याने माहे ऑक्‍टोबर 2019 मध्ये गुंडाकडून लाड यांच्यावर हल्ला केला होता. अशी फिर्याद लाड यांनी राजारामपुरी पोलिसात दिली. त्यानुसार संशयित खासगी सावकार सुभाष दुर्गेवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 व 45 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com