"नागरिकत्व'च्या विरोधात आजऱ्यात मोर्चा 

The Protest March Against Citizenship Amendment Act In Ajara Kolhapur Marathi News
The Protest March Against Citizenship Amendment Act In Ajara Kolhapur Marathi News
Updated on

आजरा : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आजऱ्यात बहुजन क्रांती संयोजन समितीने येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. एनआरसी, सीएए व एनपीआर कायदा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. बहुजन क्रांती संयोजन समितीच्या पुढाकाराने झालेल्या मोर्चात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. 

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने राष्ट्रव्यापी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आजरा शहरात मोर्चा झाला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. आजरा बाजारपेठ, संभाजी चौक मार्ग मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आला. येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हम इस देश के नागरिक है, हिंदुस्थान हमारा है, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत म्हणाले, ""ही लढाई एका मोर्चाने संपणार नाही. ती पुढे घेवून जावयाची आहे. भाजप सरकारचा पराभव करणे हे आपल्यासमोरचे ध्येय आहे.'' प्रा. डॉ. नवनाथ शिंदे म्हणाले, ""शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचाराशी आमची नाळ आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण चाललो आहोत, पण सरकार दडपशाहीच्या मार्गाने या विचारांचा गळा घोटत आहे. या सरकारला वेसण घालण्याची गरज आहे.''

अजय देशमुख म्हणाले, ""समता, बंधुता पाळणारे आहोत. काही मंडळी जाती धर्माच्या बुरसटलेल्या विचारांकडे नेत आहेत. धर्मा धर्मात व जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. त्याला विरोध करायला हवा.'' समीर खेडेकर, गौतम मोरे, राहूल मोरे, शांताराम पाटील यांची भाषणे झाली.

या वेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजन समितीचे शरद कुंभार, मुस्लीम समाजाचे नेते आदमसाब माणगावकर, पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, बी. के. कांबळे, अमानुल्ला आगलावे, नगरसेविका सुमैय्या खेडेकर, यास्मिन बुड्डेखान, रेश्‍मा सोनेखान, दिलावर चॉंद, झुबेर चॉंद, समीर चॉंद यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले. शहरातील व्यापारी, उद्योजक, दुकानदार व नागरिकांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे बंदला प्रतिसाद मिळाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com