Protests against government by bank employees in Kolhapur
Protests against government by bank employees in Kolhapur

व्हिडिओ : कोल्हापुरात बॅंक कर्मचाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार निदर्शने...

Published on

कोल्हापूर - बॅंक अधिकाऱ्यांच्या काम निश्‍चित करा, कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेंशन योजनेते सुधारणा झाली पाहिजे तसेच सरकारने 700 दिवसापासून प्रलंबित ठेवलेल्या वेतन कराराविरूध्द बॅंक कर्मचाऱ्यांनी आज बॅंक बंद ठेवल्या. तसेच, लक्ष्मीपूरी येथील बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमारे यूनायटेड फोरम ऑफ बॅंक यूनियनच्यावतीने जोरदार निदर्शने करत व सरकार विरूध्द जोरदार घोषणा दिल्या.

यामध्ये, देशातील दहा लाखाहून अधिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो बॅंक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे पाचशे कोटीहून अधिक रुपयांच्या रक्कमची उलाढाल ठप्प झाली. 

सरकार याकडे लक्ष देत नाही

बॅंक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत 700 दिवसांपासून विविध मागण्या करून वेतन करार प्रलंबित ठेवला आहे. यासाठी काल यू.एफ.बी.यूचे प्रतिनिधी आणि इंडियन बॅंक असोसिशएनमध्ये झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचा संप पुकारून ज्या-त्या जिल्ह्यात निदर्शने करण्याचा निर्णय झाला. त्यानूसार आज बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. बॅंकांची कर्जे वसुली होण्यासाठी कठोर कायदे करणे गरजेचे आहे. मात्र सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे बड्या कर्जदारांकडून कर्जबुडविण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्यांसह ठेवीदारांना बसत आहे.

सरकारने या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे

याशिवाय, नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित असलेला अकराव्या द्विपक्षीय वेतन करार तात्काळ केला पाहिजे. रिझर्व्ह बॅंकेने व इतर केंद्र सरकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या कार्यालयाप्रमाणे बॅंकांमध्येही 5 दिवसीय आठवडा यानूसार कामकाज झाले पाहिजे. बॅंक कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत आहे. अनेकांना या कामाच्या ताणामुळे विविध रोगांना सामोरी जावे लागत आहे. अशावेळेला पाच दिवसाचा आठवडा असणे गरजेचे आहे. बॅंक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी विमा योजना लागू केली पाहिजे.

यामुळे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षितता मिळू शकणार आहे. पण नवीन विमा योजनेमध्ये कुटूंबाला फायदा मिळत नाही. त्यामुळे अशा योजना तात्काळ रद्द केल्या पाहिजेत. बॅंक अधिकाऱ्यांना कामाचे नियोजन नाही. त्यामुळे त्यांनी किती तास काम करावे याला नियम नाही. यासाठी त्यांच्या कामाचे तास निश्‍चित केल्यास बॅंक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होवू शकतो. यासाठी सरकारने या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी, बॅंक संघटनेचे उपाध्यक्ष सुहास शिंदे, पांडुरंग वाइंगडे, रमेश माहिते, परेश हटकर, निखिल कुलकर्णी, तेजस्विनी पाटील, रमेश कांबळे, सूर्यकांत कर्णिक, प्रफुल्ल जाधव उपस्थित होते. 
 

संपाचा त्रास ग्राहकांना व्हावा, हा संघटनेचा उद्देश नाही. मात्र अनेक वर्षापासून प्रलबित मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. त्यांच्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांना रस्त्यावरची लढाई लढावी लागत आहे. - सुहास शिंदे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com