esakal | वैजनाथाच्या दर्शसाठी दिवसभर रांग
sakal

बोलून बातमी शोधा

Queue In Vijanatha Temple For Mahashivratra Kolhapur Marathi News

चंदगड तालुक्‍यात देवरवाडी येथील श्री देव वैजनाथ, वाघोत्रे येथील कणवेश्‍वर, मळवी, इब्राहीमपूर, खेतोबा (ता. आजरा) येथील महादेव मंदिर तसेच येथील ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या शाखेमध्ये महाशिवरात्रीचा सण साजरा झाला. या निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैजनाथ देवालयात आज दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा होत्या. उद्या (ता. 22) महाप्रसाद आहे. 

वैजनाथाच्या दर्शसाठी दिवसभर रांग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चंदगड : तालुक्‍यात देवरवाडी येथील श्री देव वैजनाथ, वाघोत्रे येथील कणवेश्‍वर, मळवी, इब्राहीमपूर, खेतोबा (ता. आजरा) येथील महादेव मंदिर तसेच येथील ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या शाखेमध्ये महाशिवरात्रीचा सण साजरा झाला. या निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैजनाथ देवालयात आज दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा होत्या. उद्या (ता. 22) महाप्रसाद आहे

कर्नाटक सीमेवरील वैजनाथ देवस्थान प्राचीन आहे. दरवर्षी महाशिवरात्रीचा सण इथे मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, निपाणी, संकेश्‍वर, बेळगाव परीसरासह कोकणातून हजारो भाविक हजेरी लावतात. पारंपरिक पध्दतीने दोन दिवस विविध विधी केले जातात. काल रात्री बारा ते आज पहाटे पाच वाजे पर्यंत मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सर्वांना सुरक्षित दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने खास नियोजन केले होते.

उन्हाचा तडाखा विचारात घेऊन मंदिराबाहेर दर्शन रांगेसाठी खास मंडप उभारण्यात आला होता. मंदिराच्या आवारात पुजेचे साहित्य तसेच प्रसाद आणि खाऊचे साहित्य असणारी दुकाने मांडण्यात आली होती. मंदिराबाहेरचा कुंड तसेच मुख्य मंदिराच्या सभोवती असणाऱ्या देवीदेवतांच्या दर्शनासाठीही गर्दी होती. उद्या (ता. 22) महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार असल्याचे मंदिर समितीचे नारायण भोगण यांनी सांगितले. 

दरम्यान पारगड मार्गावर वाघोत्रे नजीक कणवेश्‍वर मंदिरातही आज महाशिवरात्री साजरी झाली. वन विभागाच्या हद्दितील हे मंदिर जागृत मानले जाते. ग्रामस्थ आणि भाविकांकडून या मंदिराचा जीर्णोध्दार केल जात असून निसर्गाच्या कुशीतील हे मंदिर भाविकांच्या मनाला शांती देते. शेवाळे येथेही प्राचीन महादेव मंदिर असून आज दिवसभर भाविकांनी या मंदिरात दर्शन घेतले. इब्राहीमपूर येथील प्राचीन महादेव मंदिर तसेच चंदगड, आजरा तालुक्‍याच्या सीमेवर खेतोबा (ता. आजरा) येथेही महाशिवरात्रीचा उत्सव साजरा झाला.