कोरोनाची लागण शिक्षकाला होवू शकत नाही का...?

The Ratnagiri District Secondary Teachers Union is going to make the decision for the teachers without waiting for the order
The Ratnagiri District Secondary Teachers Union is going to make the decision for the teachers without waiting for the order
Updated on

खेड - राज्यातील सर्व शासकिय कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थिती रहाणार आहेत तसेच शासकिय कर्मचाऱ्यांना ऐच्छिक रजेची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना मात्र शाळेत घड्याळी चार तासाची उपस्थिती सक्तीची करण्यात येत आहे. प्रशासनाला शिक्षक माणूस वाटत नाही का ? कोरोनाची लागण शिक्षकाला होवू शकत नाही का ? आरोग्यमंत्री एक सांगतात शिक्षणमंत्री दुसरेच सांगतात. शिक्षक हा नेहमीच दुर्लक्षित रहाणार का ? शासनाचे व प्रशासनाचे धोरण बदलणार नाही का ? मा. मुख्यमंत्री साहेब प्रवास टाळा म्हणून सांगत आहेत तर शिक्षकांचा शाळेकडे जाण्याचा प्रवास सुरूच आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील शिक्षकांना वर्क फ्रॉम होम  धोरण लागू केले आहे. मा. शालेय शिक्षणमंत्री मॅडमना शिक्षकांसाठी हे धोरण राबविणे आवश्यक वाटत नाही का ? आयुक्तांची शिफारस वेगळी आणि सचिवांचा आदेश वेगळा. या सर्व परिस्थितीत  शिक्षकांमध्ये  मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना मुभा देणे आवश्यक आहे . याबाबत प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा कोणत्याही आदेशाची वाट न पाहता जिल्ह्यातील शिक्षकांसाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ योग्य तो निर्णय घेणार आहे. अशी माहिती रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सकाळ ला दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com