
गडहिंग्लज : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची (आयटीआय) गतवर्षीची फेरपरिक्षा लटकलेली आहे. गेल्यावर्षी महापूरामुळे ही परिक्षा लांबणीवर पडली. आता कोरोनामुळे या परिक्षेचा मुहुर्त लांबत चालला आहे. तब्बल आठ महिन्यापासून हजारो विद्यार्थ्यांना या परिक्षेची प्रतीक्षा लागुन राहिली आहे. अजुन किती दिवस उजळणी करायची असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. परिणामी, परिक्षेच्या निकालाअभावी पुढील प्रवेश आणि नोकरी, व्यवसायासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
सध्या शिक्षण क्षेत्रातील सर्वच अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा तुटवडा असला तरी आयटीआयने आपली जादू कायम राखली आहे. यंदाची कोरोना सावटाखाली प्रवेशप्रक्रिया होऊनही राज्यात दीड लाख जागांसाठी दुप्पटीने म्हणजेच तीन लाख अर्ज आले आहेत. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्यशासनाने देखील प्रत्येक तालुक्यात शासकिय आयटीआय सुरू केले आहे.
दरवर्षी जुलै-ऑगस्ट मध्ये आयटीआयची परिक्षा घेतली जाते. प्रात्यक्षिक, लेखी अशा दोन स्वरूपात या परिक्षा होतात. या परिक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फेरपरिक्षेची संधी दिली जाते. गतवर्षी महापुरामुळे नियमित परीक्षाच एक महिना उशिरा झाल्या. साहजिकच याचा निकालही उशिरा लागला. जानेवारीनंतर परीक्षा घेण्याचे जाहीर झाले. प्रत्यक्षात मार्चमध्ये ही परीक्षा होईल, अशी अपेक्षा असताना लाकडाउन सुरु झाले. मार्चच्या मध्यापासून बंद असलेल्या संस्था अद्याप उघडलेल्या नाहीत. सध्याची कोरोनाचा वाढता संर्सग लक्षात घेता सर्वच शिक्षण संस्था लगेचच सुरू होण्याची चिन्हे नाहीत.
परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. फेरपरीक्षा नसल्याने निकाल नाही. निकाल नसल्याने पुढील प्रवेश आणि नोकरी व्यवसायांसाठीची संपुर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे लटकलेल्या परीक्षेकडे विद्यार्थ्याचे डोळे लागून राहिले आहेत.
दृष्टीक्षेपात
- राज्यातील संस्था 986
- प्रवेशक्षमता 1 लाख 45 हजार
- शासकिय संस्था 417
- खासगी संस्था 569
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.