दिलासादायक....  कोल्हापूर शहरात घटतेय रुग्ण संख्या 

 Reassuring .... The number of patients is decreasing in Kolhapur city
Reassuring .... The number of patients is decreasing in Kolhapur city

कोल्हापूर  : जुलै, ऑगस्ट, तसेच सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. शहरासाठी ही "गुड न्यूज' असून दोन-तीन महिन्यांपासून भीतीच्या छायेत सापडलेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. दिवसागणिक किमान शंभर रुग्ण कमी आढळून येत आहे. 15 दिवसांपूर्वी दररोज अडीचशेंपर्यंत असलेली रुग्ण संख्या दीडशेपर्यंत कमी झाली आहे. 
मार्चला लॉकडाउन सुरू झाला आणि भक्तीपूजानगरात शहरात पहिला रुग्ण 26 मार्च रोजी आढळून आला. पुण्याहून रेल्वेतून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या बहिणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला. यानंतर माकडवाला वसाहत, रंकाळा टॉवर, शाहूनगर, राजारामपुरी, कदमवाडी, टिंबर मार्केट परिसर, वारे वसाहत असा एकेक भाग कोरोनाच्या छायेखाली येत गेला. एप्रिल-मेमध्ये मुंबई पुण्याहून येणाऱ्यांचा ओघ अधिक होता. त्यावेळी रुग्णांची संख्या कमी होती. जूनमध्येही संख्येत फारशी वाढ झाली नाही, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये रुग्णांच्या संख्येने विशिष्ट टोक गाठले. 
राजारामपुरी, शिवाजी पेठ, कसबा बावडा, मंगळवार पेठ, शाहूपुरी, फुलेवाडी, सोमवार पेठ, ताराबाई पार्क, नागाळा पार्क येथे संख्या वाढत गेली. जुलैमध्ये बाधितांची संख्या जशी वाढत गेली, तशी कोविड सेंटर उभारण्याची वेळ महापालिकेवर आली. कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावर त्याच्यासाठी ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करावी लागली. नेमके हेच बेड कमी पडू लागले. सीपीआर, आयसोलेशन तसेच खासगी रुग्णालयातही ऑक्‍सिजन बेड उपलब्ध नव्हते. जवळ पैसे आहेत, मात्र बेड नाही, अशी अनेकांची अवस्था झाली. त्यातून काही जणांना जीव गमवावा लागला. 
आठ-दहा दिवसांपासून मात्र बाधितांची संख्या कमी होत असल्याचे महापालिकेकडून रात्री जाहीर होणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दिवसाला 245 ते 271 कमीत कमी 200 रुग्ण आढळून येत होते. ती संख्या 133 ते 121 पर्यंत खाली आली आहे. महापालिका तसेच पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून मास्कची सक्ती केली आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. लोक स्वतःहून काळजी घेऊ लागले आहेत. 


आकडे बोलतात 

एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट- 5323 
*1 ते 15 सप्टेबर - 3444 
*16 ते 19 सप्टेबर- 558 
*20 सप्टेंबर - 150 
*21 सप्टेंबर - 190 
*22 सप्टेंबर - 145 
*23 सप्टेंबर - 69 
*24 सप्टेंबर - 120 
*25 सप्टेंबर - 87 
*26 सप्टेंबर - 54 
--------------- 
दृष्टिक्षेपात शहरातील कोरोना 
*आजअखेर एकूण रुग्णसंख्या-13244 
*प्रत्यक्ष ऍक्‍टिव्ह रुग्ण- सुमारे 1800 
*प्रतिबंधित क्षेत्रे-173 
*बंद झालेले क्षेत्रे-112 
*एकूण मृतांची संख्या-320 
* उपाययोजनांसाठी महापालिकेचा खर्च- 8 कोटी रुपये 
--------------------------------- 
हॉटस्पॉटमधील रुग्ण संख्या 
*राजारामपुरी- 801, * कसबा बावडा- 714, * शिवाजी पेठ- 613,* मंगळवार पेठ- 567, * शाहूपुरी- 443, * फुलेवाडी-399, *ताराबाई पार्क- 377, *नागाळा पार्क-361. 
------------------- 
काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. ही बाब दिलासादायक आहे. होम टू होम सर्व्हेमुळे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग होत आहे. संख्या कमी होत असली तरी लोकांनी यापुढेही सतर्कता बाळगावी. मास्क लावणे, सोशल डिस्टंन्स, सॅनिटायजरचा वापर या बाबी कटाक्षाने पाळाव्यात. 
- डॉ. अशोक पोळ, आरोग्याधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com