चित्रीतील पाणी सोडा; अन्यथा आंदोलन

Release the water in the Chitri Dam; Otherwise the movement Kolhapur Marathi News
Release the water in the Chitri Dam; Otherwise the movement Kolhapur Marathi News

आजरा : चित्री प्रकल्पातून करण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने चित्रीनदी कोरडी पडली आहे. चित्री नदीकाठच्या पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अडचणीचे बनले आहे. चित्री प्रकल्पातून तातडीने पाणी सोडावे; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा चित्री नदीकाठावरील शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहे. 

चित्री प्रकल्पासाठी तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्तांनी मोठे योगदान दिले. आजरा तालुक्‍यातील जमिनी प्रकल्पग्रस्तांना मिळाल्या. गडहिंग्लज तालुक्‍यात प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी जमीन मिळाली नाही, तरीही त्या शेतकऱ्यांचा विचार करून केले जाणारे पाणी नियोनज चुकीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्याचबरोबर गडहिंग्लज व आजरा तालुक्‍याला वरदान ठरणारा हा प्रकल्प असला तरी या पाण्याचा लाभ हा भादवण बंधाऱ्याच्या पुढील शेतकऱ्यांना होतो. या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कोरडे पात्र पाहावे लागते. हे पाणी आमच्या हक्काचे आहे.

आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध करून द्यावे. 
दोन वर्षांपूर्वी धरणात 84 टक्के पाणीसाठा असताना तत्कालीन पाटबंधाऱ्याचे अधिकाऱ्यांनी चित्री काठावरील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले. सध्या धरणात शंभर टक्के पाणीसाठा असतानाही आमची पाण्याची मागणी पुरे होत नाही, हे दुर्दैव आहे. आठवड्यातून तीन दिवस शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे. आमच्या मागण्यांचा विचार नाईलाजाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. 

विनय सबनीस, सुनील शिंदे, ऍड. सचिन इंजल, अनंत मायदेव, विनायक खटाव, धनाजी डोंगरे, जयसिंग नेवगे, रवींद्र शिंत्रे, गिरगोल कुतिन्हो, गुंडू दोरुगडे, धोंडिबा दोरुगडे, शशिकांत नार्वेकर, मारुती हातकर, रवींद्र जाधव, इंद्रजित सावंत यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com