पीडितांना मिळणार "भरोसा'तून दिलासा 

Relief from the victims from bharosa
Relief from the victims from bharosa
Updated on: 

कोल्हापूर : सासरच्या मंडळींकडून जाच होतोय, वृद्धापकाळात मुले सांभाळ करत नाहीत, बाल लैंगिक अत्याचाराची झळ कुटुंबाला सहन करावी लागते. अशा पिडीतांना त्यांच्या कुटुंबियांना व ज्येष्ठांना "भरोसा' दिला जाणार आहे. पोलिस मुख्यालयात सुरू झालेल्या "भरोसा सेल' तर्फे मार्गदर्शन व समुपदेशद्वारे त्यांना पुन्हा उभे राहण्याची संजीवनी दिली जाणार आहे. 

कोल्हापूर पोलिस दलाने महिला सुरक्षेवर फोकस केला आहे. महिलांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने महिला तक्रार निवारण कक्ष, निर्भया पथक, मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्ष सुरू आहेत. तरीही आज शिक्षित महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत आहे. याबाबत तक्रारी देण्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी अनेकांना कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा त्यातील तरतुदी, कायद्याने दिलेले अधिकार, तक्रार देण्याची प्रक्रिया याची माहितीच नाही. बाल लैंगिक अत्याचारात सापडलेल्या पिडीत मुलीसह त्यांच्या कुटुंबाला धक्का बसलेला असतो. अशावेळी त्यांना समुपदेशनाची गरज असते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुले सांभाळत नाहीत. घरातून बाहेर काढतात. अशा वेळी संबधित ज्येष्ठाना नवीन कायद्यानुसार दाद मागता येते. पण त्यांना नव्याने झालेल्या ज्येष्ठ नागरिक कायदा काय आहे, याची माहिती नाही. किरकोळ चुकीमुळे कायद्याच्या कचाट्यात विधीसंघर्ष बालके सापडतात. त्याचा भविष्याबाबत घरच्या मंडळींना काळजी लागून राहीलेली असते. अशा लोकांसाठी पोलिस मुख्यालयात "भरोसा सेल' सुरू करण्यात आला आहे. 

"भरोसा सेल'चे कार्य असे: 
- पिडीत महिलांना कौटुंबिक हिंसाचाराची माहिती देणे 
- बाल लैंगिक अत्याचार झालेल्या पिडीत मुलीसह कुटुंबीयांचे समुपदेशन 
- ज्येष्ठ नागरी कायद्याची माहिती ज्येष्ठांना देणे,आवश्‍यक ती मदत करणे 
- विधी संघर्ष बालकांचे समुपदेशन करणे 

भरोसा सेलची रचना अशी 
- महिला अधिकारी - 1 
- महिला कर्मचारी -12 
- समुपदेशक -2 

महिला सुरक्षेच्या अनुषंगाने भरोसा सेल सुरू केला आहे. यात ज्येष्ठ नागरी कायद्याची माहिती दिली जाणार आहे. पिडीत महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी त्याची मदत घ्यावी. 
- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Marathi News Esakal
www.esakal.com