
मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली असता या ठिकाणी आत्महत्येचे कारण नमूद असलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.
मिरज (सांगली) : अनेकांना कुटुंब उभा करण्यामध्ये अख्खी हयात जाते. पण एका क्षणातच संपूर्ण कुटुंबच मानसिक तणावातून उध्वस्त करणे हे खुप धक्कादायक असत. अशीच एक घटना बेळंकी येथे घडली आहे. या घटेनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या
बेळंकी येथील पोलिस निवृत्त पोलिस कर्मचारी अण्णासाहेब गव्हाणे या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली.अण्णासाहेब गुरुसिद्ध गव्हाणे( वय 67) त्यांची पत्नी मालती अण्णासाहेब गव्हाणे (वय52 )आणि मुलगा महेश अण्णासाहेब गव्हाणे (वय 28) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. अण्णासाहेब गव्हाणे हे सांगली जिल्हा पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी आहेत. आज (शनिवारी) सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे शेजार्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गावचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून याची माहिती घेतली आणि याबाबत तातडीने मिरज ग्रामीण पोलिसांना अहवाल पाठवला.
हेही वाचा- Video : देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई निष्फळ ; अण्णा हजारे उपोषणावर ठाम
चिठ्ठीतून झाला उलघडा
मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली असता या ठिकाणी आत्महत्येचे कारण नमूद असलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. प्रथम दर्शनी पाहणीमध्ये पोलिसांना या आत्महत्या कर्जबाजारीपणातून झाल्याचे निदर्शनास आले आहे. सांगली मिरज आणि तासगाव येथे काम केलेल्या पोलिस निवृत्त पोलिस कर्मचारी अण्णासाहेब गव्हाणे यांचा मुलगा महेश गव्हाणे याने शेअर मार्केट दलालीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात तोटा झाल्याने त्याने खाजगी सावकारांकडूनही कर्ज काढल्याची चर्चा होती. याच कर्जबाजारीपणातून कुटुंबाने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजले आहे.
संपादन- अर्चना बनगे