कोरोनाचं आणि वटवाघूळांच काय कनेक्शन ? लोक का देत आहेत वटवाघूळांना त्रास ?

Rumors about Corona being infected through Bats have been circulating on social media
Rumors about Corona being infected through Bats have been circulating on social media
Updated on

बेळगाव - वटवाघळे विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बीज प्रसारासाठी महत्वाची भुमिका बजावतात. कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून वटवाघूळांमुळे कोरोना होत असल्याची चर्चा होत आहे मात्र वटवाघूळामुळे कोरोना होत नसल्याचे इंडियन मेडिकल जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच वन खात्यानेही आपल्या भागातील वटवाघूळांमुळे कोविड 19 चा कोणताही त्रास नाही त्यामुळे वटवाघुळांना त्रास देण्याचे प्रकार अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहेत.

सोशल मिडीयाच्या माध्यमातुन पसरविल्या जात असलेल्या खोट्‌या माहितीमुळे अनेक भागात वटवाघळामुळे कोविड 19 होत असल्याची अफवा पसरविली जात आहे. त्यामुळे भितीने काही भागात वटवाघळे मारण्याचे प्रकार दिसून येत आहेत याची दखल घेत वन खात्याने वटवाघळे मारू नका अन्यथा वन्यजीव संरक्षण कायद्याच्या आधारे कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

खानापूर तालुक्‍यातील भिमगड अभियारण्याचा परिसर वटवाघळांसाठी प्रसिध्द असुन आपल्या भागात दोन प्रकारची वटवाघळे आढळून येतात यापैकी मोठ्या आकाराची वटवाघळे फुलांमधील मकरंद व विविध प्रकारची फळे खातात तर लहान आकारातील वटवाघळे लहान किडे व फुले खाऊन जगतात त्यामुळे वटवाघळे नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी तसेच पर्यावरण पुरक असुन वटवाघळे विविध प्रकारची फळे व फुले यांचे बिया पसरविण्यासाठी महत्वाची ठरतात त्यामुळे कोणीही वटवाघूळांना त्रास देऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वटवाघळामुळे हजारो वर्षांपासून आपल्या भागात आहेत त्यामुळे सोशल मीडियावरून वटवाघळाबाबत खोटी माहिती दिली जात आहे त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही वन खात्याने केले आहे.
 

वटवाघळांपासून कोरोनाचा संसर्ग झाला याबाबत शासंकता आहे. लोकांमध्ये भितीचे वातावरण साहजिक आहे. परंतू, स्थानिक पातळीवर वटवाघळांना हुसकावून लावण्यासाठी जे उपाय अवलंबले जात आहेत, त्यामुळे हे पक्षी मरून वेगळ्याच समस्या निर्माण होतील. त्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे. वनखात्याकडून हे प्रकार टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. तसेच वटवाघळाना त्रास दिल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाईल.

- बसवराज वाळद, वनक्षेत्रपाल खानापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Dahi Handi Govinda death in Shirol
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Marathi News Esakal
www.esakal.com