कर्नाटक राज्यात पुन्हा लॉकडाऊनची अफवा पण....

Rumors are circulating on social media that the state of Karnataka will be completely locked down
Rumors are circulating on social media that the state of Karnataka will be completely locked down

बेळगाव - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्‌या प्रमाणात वाढत असल्याने पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची अफवा सोशल मिडीयावर पसरविली जात आहे. तसेच याबाबत नागरीकांमध्येही मोठ्‌या प्रमाणात चर्चा होत आहे. मात्र सोमवारपासुन कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन होणार नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडुन देण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्‌या प्रमाणात वाढली असुन कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे सरकारने जुलै महिन्यातील दर रविवारी राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे त्यामुळे राज्यात पुर्णपणे लॉकडाऊन असणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु सरकारने राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्‍त केले असुन ज्या भागात रुग्णांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी गरज असेल तर निर्बंध घालण्याचा विचार सुरु करण्यात आला आहे. तरीही काहीजण लॉकडाऊन होणार असल्याचे संदेश पाठवित असल्याने व्यापारी व कामगार वर्गात संभ्रमावस्था निर्माण होत आहे. याकरीता लॉकडाऊनबाबत चुकीचे संदेश पाठविणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्‍यक आहे असे मत व्यक्‍त होत आहे.

दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवस करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य वर्गाचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले तर पुन्हा नागरीकांना व लहान व्यापारी वर्गाला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळेच लॉकडाऊनची चर्चा सुरु झाल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे मात्र लॉकडाऊन होणार ही फक्‍त अफवाच आहे. त्यामुळे नागरीकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे मत व्यक्‍त होत आहे.

मात्र कडक निर्बंध

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन जाहीर करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही तसेच मंत्री मंडळ बैठकही बोलाविण्यात आलेली नाही शनिवारी 9 वाजल्यापासुन सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत मात्र कडक निर्बंध घालण्यात आले आहेत याची योग्यरित्या अमंलबजावणी केली जाणार आहे असे कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com