ध्येयवेड्यांची ‘ऊर्जा’ मिळणार उद्यापासून...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन यंदाच्या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफतील. पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे दुसऱ्या, तर यशस्वी उद्योजिका मधुरा बाचल तिसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफतील. सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी शेवटचे पुष्प गुंफतील.

कोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (ता. २) पासून सलग चार दिवस संजय घोडावत विद्यापीठ प्रस्तुत ‘ऊर्जा- संवाद ध्येयवेड्यांशी’ हा उपक्रम होणार आहे. या अनोख्या संवाद मालिकेची उत्सुकता शिगेला पोचली असून, प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन सहाव्या वर्षीच्या संवाद मालिकेचे पहिले पुष्प गुंफतील. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात रोज सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची पर्वणी मिळणार आहे. दरम्यान, मोफत सन्मानिका ‘सकाळ’च्या शिवाजी उद्यमनगर येथील मुख्य कार्यालयात सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत उपलब्ध केल्या आहेत. कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश असेल. 

सहा ते रात्री आठ या वेळेत रंगतील मुलाखती

सलग सहाव्या वर्षी ही संवाद मालिका होणार असून, नामवंत वक्‍त्यांची परंपरा यंदाही कायम आहे. आपापल्या क्षेत्रात यशोलौकिकाचे शिलेदार ठरलेली ही मंडळी प्रत्येकातील नवचेतना जागविताना नेटाने पुढे जाण्यासाठीची ऊर्जाही देणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन यंदाच्या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफतील. पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे दुसऱ्या, तर यशस्वी उद्योजिका मधुरा बाचल तिसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफतील. सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी शेवटचे पुष्प गुंफतील. दरम्यान, या उपक्रमाला सहा वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात रोज सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत मुलाखती रंगतील. माहितीसाठी संपर्क - सूरज (९५५२५८१९१८)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Media Group will be an initiative with urja program