बॅंक बुडवणाऱ्यांकडेच मदत मागण्याची वेळ ; समरजितसिंह घाटगे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

श्री. घाटगे यांनी सोनाळी परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यता समजावून घेतल्या

बिद्री- शेतकऱ्यांची बॅंक म्हणून नावारूपास आलेली भूविकास बॅंक ज्यांनी बुडविली ते सत्तेत आहेत आणि त्यांच्याकडेच शेतकऱ्यांना बॅंकेच्या कर्जाबाबत मदत मागण्याची वेळ आली आहे, असे खोचक वक्तव्य शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद या कार्यक्रमांतर्गत सोनाळी (ता. कागल) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

श्री. घाटगे यांनी सोनाळी परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यता समजावून घेतल्या. शेतकऱ्यांनी श्री. घाटगे यांचा ऊसाची मोळी देऊन सत्कार केला. 
"बिद्री'चे संचालक बाबासाहेब पाटील, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, संजय पाटील, सुखदेव चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले. 

हे पण वाचा - विना अट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहे

 

कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बॅंकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, "बिद्री'चे संचालक दत्तामामा खराडे, सुनिल सूर्यवंशी, सुनील मगदूम आदी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samarjeet ghatge criticism on minister hasan mushrif