"सनई'चे सूर झाले बेसूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

नातू आणि नातीचा विवाह म्हणजे वृद्ध आजी-आजोबांच्या दृष्टीने अगदी आनंदाचा क्षण. जयसिंगपूरचे मगदूम आणि गडहिंग्लजमधील कोड्ड ही दोन कुटूंबेही त्याला अपवाद नव्हती. विवाह मंडपात सगळीकडे आनंदाचे वातावरण असतानाच अचानक या सोहळ्यातील "सनई'चे सूर बेसूर झाले.

गडहिंग्लज : नातू आणि नातीचा विवाह म्हणजे वृद्ध आजी-आजोबांच्या दृष्टीने अगदी आनंदाचा क्षण. जयसिंगपूरचे मगदूम आणि गडहिंग्लजमधील कोड्ड ही दोन कुटूंबेही त्याला अपवाद नव्हती. विवाह मंडपात सगळीकडे आनंदाचे वातावरण असतानाच अचानक या सोहळ्यातील "सनई'चे सूर बेसूर झाले.

नातवाच्या लग्नासाठी उत्साहाने सहभागी झालेल्या येथील श्रीमती प्रमिला शिवलिंग हंजी (वय 72) यांचे हृदयविकाराने निधन झाले. येथील व्यापारी सुनिल व अनिल हंजी यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

येथील श्रीमती प्रमिला हंजी यांच्या मुलीचे सासर जयसिंगपूर होय. मुलीचा मुलगा मंदार मगदूम आणि गडहिंग्लजमधील आप्पासाहेब कोड्ड यांची द्वितीय सुकन्या असावरी यांचा विवाह निश्‍चित झाला होता. कोड्ड यांच्या मालकीच्या वडरगे-बहिरेवाडी रोडवरील फार्म हाऊसमध्ये पहाटेपासून मोजक्‍या व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नाची तयारी सुरू होती.

सकाळी सव्वा दहाच्या सुमारासच श्रीमती प्रमिला यांना चक्कर आली अन्‌ त्या जागेवरच कोसळल्या. प्रमिला यांना उपचारासाठी गडहिंग्लजकडे आणण्यात आले. परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले. कोरोनामुळे वडरगे-बहिरेवाडी मार्ग बंद आहे.

श्रीमती प्रमिला यांना चक्कर आल्यानंतर उपचारासाठी गडहिंग्लजला आणले जात होते. परंतु, वडरगे-गडहिंग्लज अगदी जवळचे अंतर असूनही केवळ रस्ता बंद असल्याने पुन्हा मुम्मेवाडी-कडगाव असा फेरा मारून गडहिंग्लजमधील हॉस्पीटल गाठावे लागले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Sanai's tune became out of tune